छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो, ज्याची नेहमी चर्चा असते तो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. गेल्या कित्येक वर्षांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहे. या शोमधल्या प्रत्येक कलाकाराने आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे या शोचा जितका मोठा चाहता वर्ग आहे, तितकाच या शोमधल्या कलाकारांचा आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांनी हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता या शोमधील एका अभिनेत्याची वर्णी हिंदी कॉमेडी शोमध्ये लागली आहे. याचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Video: चेंगराचेंगरी, पोलिसांच्या लाठीचार्जनंतर अखेर चाहत्यांना दिसली सलमान खानची झलक, भाईजानने खास अंदाजात दिल्या ईदच्या शुभेच्छा

‘आय एम ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ असं म्हणत घराघरात पोहोचलेला गौरव मोरे हिंदी कॉमेडी शो ‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री हेमांगी कवी व अभिनेता कुशल बद्रिकेबरोबर गौरव झळकला आहे. ‘सोनी टीव्ही’च्या इन्स्टाग्राम पेजवर गौरव, हेमांगी व कुशल यांच्या स्किटचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

गौरवची हिंदी कॉमेडी शोमधली एन्ट्री पाहून चाहत्यांना देखील आनंद झाला आहे. “गौरव, कुशल आणि हेमांगी तुमचा अभिमान वाटतो”, “गौरव भावा एक नंबर. तुला खूप खूप शुभेच्छा”, “खतरनाक”, “हास्यजत्रा सोडू नको”, “क्या बात है”, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी गौरवच्या या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: आमिर खानने कुटुंबासह साजरी केली ईद; पापाराझींना वाटली मिठाई, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, गौरवच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय तो ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटातही पाहायला मिळणार आहे. गौरवचा हा चित्रपट ६ डिसेंबर २०२४ला प्रदर्शित होणार आहे.