‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे. कलाकारांना या कार्यक्रमाने नवी ओळख मिळाली. प्रेक्षक या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांवर भरभरून प्रेम करत असतात. यापैकीच एक म्हणजे निखिल बने. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तून निखिल नावारूपाला आला. पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.

निखिलचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. सोशल मीडियावर सक्रिय राहून निखिल त्याच्या आयुष्यातल्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतो. याबरोबरच अनेक मुलाखतींमधून देखील तो त्याच्या आयुष्यबद्दलच्या अनेक गोष्टी शेअर करत असतो. तर आता त्याने ऑडिशनची एक आठवण सांगितली आहे.

आणखी वाचा : ‘ही’ आहे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेची क्रश, लाजत सांगितलं नाव, म्हणाला…

निखिल म्हणाला, “मी कॉलेजमध्ये असताना भरपूर ऑडिशन्स व्हायच्या पण अनेक ऑडिशन्सबद्दल मला कळायचंच नाही. त्या काळामध्ये झी युवा नुकताच सुरू झाला होता. त्या चॅनलवर नवीन मालिका येणार होत्या आणि त्यासाठी ऑडिशन्स घेण्यात येत होत्या. आम्हाला त्या ऑडिशनबद्दल कळलं आणि मी आणि माझा मित्र ऑडिशन देण्यासाठी तिथे गेलो. तिथे काउंटर वर काही फॉर्म ठेवले होते ते फॉर्म भरून त्यांना द्यायचे आणि मग ते सांगणार होते की कोणत्या भूमिकेचं वाचायचं. आम्ही त्या काउंटरपाशी गेलो आणि त्यांना ऑडिशनचा फॉर्म मागितला.”

हेही वाचा : “कार्यक्रमात माझ्या जाडेपणाबद्दल विनोद केले तर…”, विशाखा सुभेदार स्पष्टच बोलल्या, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं उदाहरण देत म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे तो म्हणाला, “त्यांनी आमच्याकडे पाहिलं आणि आम्हाला विचारलं, इथे कशाला आला आहात. मी आणि माझा मित्र थोडे गोंधळलो आणि म्हणालो की, ऑडिशनला आलो आहोत. त्यावर ते म्हणाले, तुम्ही परत जा. इथे थांबू नका. तुमचा उगाच वेळ वाया जाईल. त्यांनी आम्हाला नीट शब्दातच सांगितलं पण अगदीच थेट सांगितलं. त्यांचं बोलणं ऐकून काय करावं आम्हाला कळलं नाही. आम्ही त्यांना बरं म्हणून तिकडून निघालो.”