कॉमेडी किंग ओंकार भोजने त्याच्या विनोदी अभिनयशैलीने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतो. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून ओंकार घराघरात पोहोचला. त्याचा चाहता वर्गही मोठा आहे. आता ओंकार झी वाहिनीवरील ‘फू बाई फू’ कार्यक्रमातून प्रेक्षकांना हसवणार आहे.
ओंकारचा ‘फू बाई फू’ कार्यक्रमातील एक प्रोमो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ओंकार राजकीय नेत्यांच्या लूकमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये दोन गट दिसत असून “आम्हीच जिंकणार”, असा संवाद या गटांत होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचं नाट्य रुपांतर व्हिडीओत दिसत आहे. दोन वेगळ्या राजकीय नेत्यांच्या लूकमधील ओंकार भोजनेचा हा व्हिडीओ त्याच्या एका फॅन पेजच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा >> “तुझ्या स्वयंवरमध्ये विजय देवराकोंडाला बघायला आवडेल का?”, जान्हवी म्हणते “त्याचं लग्न…”
हेही वाचा >> Video : सैफ अली खानची पॅण्ट खाली खेचत होता तैमूर अन्…; एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल
ओंकार हास्यजत्रेत विविध भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. ‘अगं अगं आई’ असो अथवा गौरवचा मामा प्रत्येक विनोदी भूमिकेतून प्रेक्षकांना तो पोट धरुन हसायला भाग पाडतो. आता ‘फू बाई फू’ मधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे त्याचे चाहतेही आनंदी आहेत.
हेही पाहा >> Photos : “बेरोजगारीमुळे मी केस वाढवले पण…”, गौरव मोरेने सांगितला गुगलची अॅड मिळाल्याचा ‘तो’ किस्सा
छोट्या पडद्यावरील ‘फू बाई फू’ हा लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. तब्बल नऊ वर्षांनी हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सुरू होत आहे. येत्या ९ नोव्हेंबरपासून ‘फू बाई फू’ कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.