‘सोनी मराठी’ वाहिनीवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमानं प्रेक्षकांचा काही काळासाठी निरोप घेतला होता. अमेरिकेतल्या मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर २३ दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यादरम्यान घडलेला पृथ्वीकचा एक किस्सा अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने नुकताच सांगितला.

हेही वाचा – “…नाहीतर मी विचित्र झोनमध्ये जाते”, अभिनेत्री स्पृहा जोशीचा खुलासा; म्हणाली, “माझ्या डोक्याला…”

‘इट्स मज्जा’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी बोलताना प्रियदर्शनीनं पृथ्वीकचा अमेरिकेतल्या शोदरम्यानचा किस्सा सांगितला. ती म्हणाली की, “पृथ्वीक किती डाउन टू अर्थ आहे, याचा मला एक किस्सा सांगायचा आहे. आमच्या सगळ्यांचीच एकत्र प्रगती होत आहे, याची एक वेगळीच मज्जा येतेय. आम्ही अमेरिकेच्या दौऱ्यावर होतो. त्यावेळेस शोमध्ये प्रत्येकाच्या एंट्रीला वेगवेगळ्या टाळ्या यायच्या. पण पृथ्वीक आणि दत्तू हे दोघं एकत्र एंट्री घ्यायचे, हे आम्हाला एक-दोन शोनंतर लक्षात आलं. मग हेच पृथ्वीकच्या लक्षात आलं की, दत्तूसाठी वेगळ्या टाळ्या आहेत. त्यामुळे पृथ्वीक स्टेजवर पहिला दत्तूला पुढे पाठवायचा, त्याच्या टाळ्या घेऊ झाल्यानंतरच मग पृथ्वीक स्वतःची एंट्री करायचा.”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री झळकणार ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत; दिसणार ‘या’ भूमिकेत

दरम्यान, अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांचाही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद मिळाला. याचं संबंधीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या अमेरिका दौऱ्यानंतर आता लाडके विनोदवीर महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

हेही वाचा – “…त्या दिवशी माझा सगळा माज उतरला”; स्पृहा जोशीनं सांगितला अनुभव, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोट धरून आणि पोट भरून हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील हे विनोदवीर १४ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाची जागा आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घेणार असल्याचं म्हटलं जातं आहे.