छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाला ओळखले जाते. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे कायमच चर्चेत असतात. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर सतत सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतंच प्रियदर्शनीने काही जुने फोटो पोस्ट केले आहेत. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

प्रियदर्शनी इंदलकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रियदर्शनीने तिचे दहावीतील काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत ती उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्याबरोबर दिसत आहे. तर इतर दोन फोटोत तिने अभिनेत्री झाल्यानंतर त्यांच्याबरोबर काढलेले पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : Video : “आपल्या बापाने…”, ईडीच्या कारवाईनंतर लेकीच्या प्रतिक्रियेबद्दल संजय राऊतांनी केला खुलासा

या फोटोला तिने हटके कॅप्शनही दिले आहे. “१० वी मधे ‘नवा गडी नवं राज्य’, च्या प्रयोगानंतर बॅकस्टेजला जाऊन फोटो काढलेले, त्या नंतर जवळपास १३ वर्षांनी फोटो काढले, ‘फुलराणी’ च्या प्रीमियरनंतर!

त्या प्रीमियरच्या रात्री, त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी अभिमान दिसत होता आणि तो क्षण माझ्यासाठी फारच खास होता. खूप प्रेम. ते दोघेही मी पुन्हा सांगते ते दोघेही आजही तसेच काहीसे दिसतात, पण कसे आणि माझ्याबद्दल मी न बोललेलच बरं!” असे कॅप्शन प्रियदर्शनीने या फोटोला दिले आहे.

आणखी वाचा : Video : “राज ठाकरे की उद्धव ठाकरे? महाराष्ट्र जास्त समर्थपणे कोण सांभाळू शकतं?” उर्मिला मातोंडकर म्हणतात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिच्या या पोस्टवर अभिनेत्री प्रिया बापटने प्रतिक्रिया दिली आहे. “प्रियदर्शनी काय कमाल आठवण आहे ही, तू खरंच उत्तम अभिनेत्री आहेस आणि तू या प्रेमासाठी नक्कीच पात्र आहेस”, अशी कमेंट प्रिया बापटने केली आहे.