Maharashtrachi Hasyajatra Fame Actor Rohit Mane Post For Wife : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम जगभरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकारांना घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. अनेक नवोदित कलाकार प्रकाशझोतात आले. यापैकीच एक म्हणजे रोहित माने. त्याने सोशल मीडियावर नुकतीच आपल्या पत्नीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

रोहित आणि त्याची पत्नी श्रद्धा या दोघांचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. रोहित-श्रद्धाकडे आजची तरुणाई ‘कपल गोल्स’ म्हणून पाहते. आज श्रद्धाच्या वाढदिवसानिमित्त रोहितने तिच्यासाठी खास पत्र लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रोहित मानेची पत्नीच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट

प्रिय श्रद्धा!

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊदेत आणि तू ज्या-ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करशील त्यात तुला यश मिळूदेत.

१६ सप्टेंबर ही तारीख तुझ्या एकटीच्या नव्हे तर माझ्या आयुष्यात सुद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे. अशीच कायम माझ्याबरोबर राहा. तू आजवर प्रत्येक गोष्टीत मला पाठिंबा दिला आहेस. तुझी साथ नसेल तर मी काहीच नाहीये…मी मीच नाहीये. तू माझं सगळं चांगलं-वाईट वागणं सहन करतेस. त्या सगळ्या गोष्टींसाठी सॉरी म्हणतो ज्यामुळे तुला माझा त्रास होतो आणि थँक्यू की तू कधीही कोणतीही तक्रार न करता कायम मला समजून घेतेस.

माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते असंच कायम राहील. यात कधीही काहीच बदल होणार नाही. मी तुला कायम असंच आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि तुला हवी असणारी प्रत्येक गोष्ट देण्याचा प्रयत्न करेन. मला माहितीये मी कधीकधी खूप वेड्यासारखा वागतो, चुकतो पण मला माहीत आहे या सगळ्या गोष्टींमध्ये तुच मला समजून घेऊ शकतेस. आपल्या आयुष्यात तुझ्याशिवाय माझी कोणतीच गोष्ट मी पूर्ण होऊ शकत नाही कारण, तुझ्यामुळेच आपल्या संसाराला पूर्णत्व येतं.

माझा मूर्खपणा, माझा वेडेपणा, माझा थोडासा त्रास सहन करण्याची ताकद देव कायम तुला देवो. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे मी इतक्या कमी शब्दात सांगू शकत नाही. सगळ्या गोष्टींसाठी खूप-खूप थँक्यू आणि मी आजवर केलेल्या चुकांसाठी माफी मागतो. आय लव्ह यू…खूप खूप प्रेम. Happy Birthday बायको. तुझाच रोहित उर्फ सावत्या.

दरम्यान, रोहितने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. नम्रता संभेराव यावर कमेंट करत म्हणते, “क्युटेस्ट पोस्ट श्रद्धा हॅपी बर्थडे बेबी…माझी लाडकी” याशिवाय वनिताने सुद्धा खास कमेंट करत श्रद्धाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.