छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेत्री शिवाली परब घराघरात पोहोचली. विनोदाचं अचूक टायमिंग साधत शिवाली प्रेक्षकांना खळखळून हसवते. सध्या शिवालीच्या एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

शिवालीने नुकताच ‘अ‍ॅक्शन हिरो’ हा चित्रपट पाहिला. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट शिवालीच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटातील आयुष्मानने साकारलेली ‘मानव’ ही भूमिका तिला विशेष भावली. म्हणूनच शिवालीने चित्रपट पाहिल्यानंतर आयुष्मान खुरानासाठी एक खास पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली आहे.

हेही वाचा>>“आमचं कोकणही गेली १२ वर्षे…” समृद्धी महामार्ग उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट

शिवालीने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘अ‍ॅक्शन हिरो’ चित्रपटातील गाण्यावर शिवाली व्हिडीओत डान्स करताना दिसत आहे. या पोस्टमध्ये तिने आयुष्मानला टॅगही केलं आहे. ती म्हणते, “आय लव्ह यू मानव. मला हा चित्रपट खूप आवडला. या चित्रपटाबद्दल माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी हा रील व्हिडीओ बनवण्याचं मी ठरवलं. मीही एक अभिनेत्री आहे. पण तुझा चित्रपट पाहिल्यानंतर तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे, हे माझ्या लक्षात आलं. तुझे खूप धन्यवाद”.

हेही वाचा>>Video: बिग बींची नात व सिद्धांत चतुर्वेदी एकत्र झाले स्पॉट; कॅमेऱ्यात कैद झाल्याचं कळताच नव्या लाजली अन्…; व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा>>राणादा-पाठकबाईंनंतर मालिका विश्वातील अभिनेत्याची लगीनघाई, गुपचूप उरकला साखरपुडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवालीच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. शिवाली लवकरच ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.