‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रम आहे. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही हा कार्यक्रम प्रेक्षक आवडीने पाहतात. या कार्यक्रमातील कलाकारांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. अभिनेत्री शिवाली परबला सुद्धा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे एक वेगळी ओळख मिळाली. सोशल मीडियावर कायमच सक्रिय असणाऱ्या शिवालीच्या एका पोस्टने सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा : “आदिपुरुषमुळे सनातन धर्माच्या…” AICWA चे गृहमंत्री अमित शाहांना पत्र, निर्मात्यांविरोधात FIR नोंदवण्याची मागणी

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम अभिनेत्री शिवाली परबने सोशल मीडियावर खास हातात कॉफी मग घेऊन बोल्ड अंदाजात फोटो शेअर केला आहे. शिवालीने या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. “मी माझ्या कॉफी पार्टनरची वाट बघतेय…” असे अभिनेत्रीने म्हटले आहे.

हेही वाचा : “मुलींप्रमाणे काही मुलं माझ्या प्रेमात…” भर कार्यक्रमात कार्तिक आर्यनने केलेलं ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाला…

शिवालीचे भन्नाट कॅप्शन वाचून तिच्या चाहत्यांनी यावर, “मी येऊ का कॉफीसाठी?”, “खूप खूप सुंदर…”, “तू कॉफीची नाही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या शूटिंगची वाट बघतेस का? ” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच शिवालीची मैत्रीण आणि तिची सहकलाकार प्रियदर्शनी इंदलकरने या फोटोवर “बापरे!!!” अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा : Video : विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाने कुटुंबीयांबरोबर केलं एकत्र लंच; नेटकरी म्हणाले, “दोघांच्या घरी लगीनघाई…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात साकारत असलेल्या शिवालीच्या प्रत्येक भूमिकेचे प्रेक्षक कौतुक करताना दिसतात. यामुळे तिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे.