‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात २ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकली. वनिताने बॉयफ्रेंड सुमित लोंढेबरोबर सपत्पदी घेत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत वनिता व सुमितचा लग्नसोहळा पार पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वनिता व सुमितच्या लग्नसोहळ्यातील धामधुम त्यांच्या लग्नातील फोटो व व्हिडीओंमध्ये पाहायला मिळत आहे. लग्न झाल्यानंतर वनिताने सुमितसाठी खास उखाणाही घेतला. याचा व्हिडीओ ‘पर्पल मराठी’ या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये वऱ्हाडी मंडळी नववधू वनिताला उखाणा घेण्यासाठी आग्रह करताना दिसत आहेत. पाहुण्यांच्या आग्रहास्तव वनिताने सुमितसाठी तिच्या स्टाइलमध्ये खास उखाणा घेतला आहे.

हेही वाचा>>Video: वनिता खरात-सुमित लोंढेचा हळदी कार्यक्रमात भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

“टेन्शन रिलीज करायला शोधले मी फंडे सतरा, टेन्शन रिलीज करायला शोधले मी फंडे सतरा…सुमित, तूच माझा महाराष्ट्र तूच माझी हास्यजत्रा”, असा खास उखाणा वनिताने सुमितसाठी घेतला आहे. वनिताने उखाणा घेताच जमलेल्या मंडळींनी कल्ला केल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. वनिताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही पाहा>> Photos: लॉकडाऊनमध्ये मैत्री, लुडो खेळताना झालं प्रेम अन् आता थाटणार संसार; वनिता खरात-सुमित लोंढेची लव्हस्टोरी

हेही वाचा>> स्वत:च्याच हळदीत बेभान होऊन नाचली वनिता खरात, फोटो व्हायरल

वनिता व सुमितच्या लग्नात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. वनिताचा नवरा सुमित एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. त्याला फिरण्याचीही प्रचंड आवड आहे. एका पिकनिकमध्ये वनिता व सुमित एकमेकांना भेटले. आधीपासूनच मित्र असलेल्या वनिता व सुमितची पिकनिकनंतर घट्ट मैत्री झाली. लॉकडाऊनमध्ये ते एकत्र लुडोही खेळायचे. मैत्रीचं रुपातंर प्रेमात झाल्यानंतर वनिता व सुमितने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame vanita kharat special ukhana for husband sumit londhe wedding video viral kak