छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातून अभिनेत्री वनिता खरातला लोकप्रियता मिळाली. हास्यजत्रेतून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी वनिता लवकरच बोहल्यावर चढणार आहे. वनिता बॉयफ्रेंड सुमीत लोंढेसह विवाहबंधनात अडकणार आहे.

वनिता व सुमीतच्या घरी लगीनघाई सुरू आहे. वनिता व सुमीतच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. नुकताच वनिताचा मेहेंदी सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वनिताच्या मेहेंदी सोहळ्यात हास्यजत्रेतील कलाकारांनी हजेरी लावली होती. शिवाली परब, चेतना भट्ट यांनी वनिताच्या मेहेंदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा>> ‘पठाण’च्या यशानंतर ‘पठाण २’ येणार! दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांची मोठी घोषणा

vanita kharat wedding

वनिता व सुमीत २ फ्रेबुवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. लग्नकार्याला काहीच दिवस शिल्लक राहिल्याने वनिता व सुमीतच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे.

हेही वाचा>> विशाखा सुभेदारच्या डान्स व्हिडीओवर गणेश आचार्यांची कमेंट, अभिनेत्रीने भारावून शेअर केली पोस्ट, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या वनिताने चित्रपटांमध्येही काम केलं आहे. शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटातील तिने साकारलेल्या भूमिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वनिता ‘सरला एक कोटी’ चित्रपटातही झळकली होती. वनिताचा होणारा नवरा सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. त्याला फिरण्याचीही प्रचंड हौस आहे. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतात.