विविध विनोदी भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. ती कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. विशाखा सुभेदारने ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विशाखा नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. नवनवीन फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.
हेही वाचा- “मी मानसिक पुणेकर, दुपारी २ ते ४ बंद…”, अभिनेत्री स्पृहा जोशीचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत
नुकतंच विशाखाला इन्स्टाग्रामवर ‘ब्ल्यू-टिक’ मिळाली आहे. इन्स्टाग्रामवर तिचे एक लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. आता ‘ब्ल्यू-टिक’ मिळाल्यावरुन एका चाहत्याने विशाखाला ट्रोल केलं आहे. काही दिवसांपूर्वी विशाखाने इन्स्टाग्रामवर एक डान्सचा व्हिडिओ शेअऱ केला होता. या व्हिडीओवर एका चाहत्याने “ब्ल्यू-टिक किती रुपयांना घेतली? घेताना काही कमी करुन मागितले काय?” अशी कमेंट केली होती. हा प्रश्न विचाऱणाऱ्या चाहत्याला विशाखाने सडेतोड उत्तर दिलं आहे.
त्याच्या कमेंटवर रिप्लाय करत विशाखाने “नाही हो…नेमकी विकत देत होते त्याच्या आदल्या रात्री ब्लू टिक मिळाली. सुदैवी नाहीतर उगाचच पैसे खर्च करावे लागले असते…thank god आणि हे insta वाले काहीच कमी पण नाही ना करत.. पण काय झालंय महिना तोच असल्याने गैरसमज होऊ शकतो…हा आत्ता विकत घेतली नाही ह्याचा पुरावा उभा नाही करु शकत तुमच्या कोर्टात…त्यामुळे जे घडलं ते मी आणि insta आम्हालाच माहीत आणि हे सत्य मी गीतेवर हात ठेवून सांगायला तयार आहे…बाकीं आपणास काय समजायचं ते समजा,”असं म्हटलं आहे.
दरम्यान विशाखा सुभेदार यांनी ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशाखा सुभेदार यांनी आतापर्यंत ‘फक्त लढ म्हणा’ (२०११), ‘४ इडियट्स’ (२०१२) आणि ‘अरे आवाज कोनाचा’ (२०१३) अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अलिकडच्या काळात, विशाखा ‘ये रे ये रे पैसा’ (२०१८) आणि ६६ सदाशिव (२०१९) या चित्रपटांमध्ये दिसली होती.