Mahhi Vij Reacts On Divorce Rumours : मनोरंजन विश्वात गेल्या काही दिवसांपासून कलाकारांच्या विभक्त झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यात गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर माही विज आणि जय भानुशाली यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या आणि दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चाही होत आहेत. यावर आता स्वत: माहीनं प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह सर्वच माध्यमांनी माही आणि जय यांच्या घटस्फोटाबद्दलच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. अशातच thou.ghtful16 या इन्स्टाग्राम पेजद्वारे माही आणि जय यांच्या विभक्त झाल्याची पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टच्या कमेंट्समध्ये माहीनं स्वत: कमेंट करत घटस्फोटाच्या चर्चांना उत्तर दिलं आहे.
thou.ghtful16 या इन्स्टाग्राम पेजनं माही आणि जय यांचा मुलीबरोबरचा फोटो शेअर करीत कॅप्शनमध्ये म्हटलंय, “अभिनेता जय भानुशाली आणि अभिनेत्री माही विज यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असून, दोघे घटस्फोट घेण्याच्या मार्गावर आहेत. तसंच माही आणि त्याची मुलगी ताऱाच्या वाढदिवसाच्या पार्टीत शेवटचे एकत्र दिसले होते.” या पोस्टवर माहीनं कमेंट करत उत्तर दिलं आहे.
या पोस्टखालील कमेंट्समध्ये माही उत्तर देत स्पष्टपणे म्हणते की, “उगाच खोट्या बातम्या पोस्ट करू नका, मी याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार आहे.” तिच्या या कमेंटवर उत्तर देत इतर नेटकऱ्यांनीसुद्धा तिला पाठिंबा दिला आहे. ‘खरंच आहे, तुम्ही चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई करावी’ असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.
माही आणि जय यांच्या घटस्फोटाबद्दलची व्हायरल पोस्ट
माही विजनं जयबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चाना दिलं स्पष्ट उत्तर

दरम्यान, जय आणि माही या दोघांच्या घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान, जयनं नुकताच लेक ताराबरोबरचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात दोघे बाप-लेक मज्जा करताना दिसत आहेत. “जेव्हा बाबा मुलीबरोबर एकटा असतो, तेव्हा असं व्हायलाच पाहिजे,” असं कॅप्शन देत जयने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांच्याही विशेष पसंतीस पडला आहे. याच व्हिडीओवर माहीनंही कमेंट केलीय.
“Tara Is The Cutest” अशी कमेंट माहीनं केली असून पुन्हा या कमेंटला जयनं “खरंय” म्हणत उत्तर दिलं आहे. त्यामुळे जय आणि माही यांच्या नात्याबद्दलच्या चर्चा या केवळ चर्चाच असल्याचं कळत आहे. त्यात आता स्वत: माहीनंदेखील अशा चर्चा आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्यांबद्दल कायदेशीर कारवाई करणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे.
