Mahi Vij Jay Bhanushali Divorce: अभिनेता जय भानुशाली व त्याची पत्नी माही विज यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं आहे. या जोडप्याचा १४ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट झाल्याच्या चर्चा होत आहेत. दोघांनी घटस्फोटांच्या कागदपत्रांवर सह्या केल्या आहेत, अशी माहिती समोर आली आहे. याचदरम्यान जय भानुशालीच्या पोस्टवर माही विजने केलेली कमेंट चर्चेत आहे.
जय व माही एकमेकांबरोबरचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत नाहीत. माही व जय दोघेही लेक ताराबरोबरचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. जय व माही यांनी अद्याप घटस्फोटाच्या चर्चांवर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. अशातच माही विजने जय भानुशालीच्या पोस्टवर केलेल्या कमेंटने लक्ष वेधलं आहे.
जय भानुशालीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये जय त्याची लेक ताराबरोबर मस्ती करतोय. जय कॅमेऱ्यासमोर उभा आहे, तर तारा डान्स करतेय. “जेव्हा बाबा मुलीबरोबर एकटा असतो, तेव्हा असं व्हायलाच पाहिजे,” असं कॅप्शन जयने या व्हिडीओला दिलं आहे.
पाहा व्हिडीओ
जय भानुशालीच्या व्हिडीओवर ‘Tara is the cutest,’ अशी कमेंट केली आहे. त्यावर ‘खरंय’ लिहून जयने हसणारे इमोजी कमेंट करून रिप्लाय दिला.

दरम्यान, हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, जय भानुशाली आणि माही विज यांच्यात दुरावा आला आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्यांनी घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सह्या केल्या आणि जुलै-ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. जय व माही काही काळापासून वेगळे राहत होते. त्यांनी त्यांचं नातं वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण त्यांना यश आलं नाही आणि शेवटी त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
जय भानुशाली व माही विज यांनी २०११ मध्ये लग्न केलं होतं. या जोडप्याने २०१७ मध्ये राजवीर आणि खुशी ही दोन मुले दत्तक घेतली. २०१९ मध्ये माही आयव्हीएफद्वारे गर्भवती राहिली आणि तिने तारा नावाच्या मुलीला जन्म दिला. यंदा ताराच्या वाढदिवसाला जय व माही एकत्र दिसले होते.
