छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खानला जून महिन्यात तिसऱ्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान झाले. त्यानंतर तिने तिच्या चाहत्यांना याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. हिनावर सध्या उपचार सुरू आहेत. हिना तिच्या उपचारांबद्दल चाहत्यांना माहिती देत असते. हिनाला अनेकांनी कमेंट्स करून धीर दिला होता. त्यापैकीच एक म्हणजे महिमा चौधरी होय. हिनाचे उपचार सुरू असताना महिमाने तिची भेट घेतली. आता महिमाच्या वाढदिवसानिमित्त तिला शुभेच्छा देताना हिनाने तिच्याबरोबरचा फोटो पोस्ट करत तिचे आभार मानले आहेत.

हिना खानने तिला कर्करोग झाल्याची घोषणा इन्स्टाग्रामवर केली होती. त्या पोस्टवर महिमा चौधरीने तिला पाठिंबा देणारा मेसेज लिहिला होता. “हिना, तू खूप धाडसी आहेस. तू या कठीण परिस्थितीशी सामना करणारी आहेस, आणि लवकरच तू बरी होशील. तुझ्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करणारे लाखो लोक आहेत, आणि तुझ्या या प्रवासात मी नेहमीच तुझ्याबरोबर असेन. माझं तुला खूप प्रेम!” असं म्हणत महिमाने हिनाला धीर दिला होता.

हेही वाचा…आर्याने निक्कीला मारली कानाखाली; ‘बिग बॉस’कडून मोठी शिक्षा! आता जेलमध्ये टाकलं, अंतिम निर्णय कोण घेणार?

महिमा चौधरीला २०२२ मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. आपले उपचार पूर्ण झाल्याचा खुलासा तिने याआधी केला होता. उपचार पूर्ण झाल्यानंतर महिमाने तिच्या अनुभवांवरूनच हिनासाठी मेसेज लिहिला होता. हिनाच्या नवीन इन्स्टाग्राम पोस्टवरून असं समजतं की महिमाने हिनाच्या उपचारादरम्यान अनेक पातळ्यांवर तिला मदत केली आहे. या पोस्टमध्ये हिनाने एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये हिना हॉस्पिटलमध्ये असून, तिच्या हाताला सलाईन लावलेलं दिसतंय. तिच्या शेजारी महिमा चौधरी टोपी घालून बसलेली आहे. या फोटोत फोटोत दोघीही हसताना दिसत आहेत.

हिनाने महिमा आणि तिचा फोटो पोस्ट करत लिहिलं आहे, “हा माझ्या पहिल्या किमोथेरपीच्या दिवशीचा फोटो आहे. या देवदूतासारख्या महिलेनं मला रुग्णालयात पहिल्याच दिवशी अचानक सुखद धक्का दिला. माझ्या आयुष्यातील या कठीण काळात ती नेहमीच माझ्याबरोबर राहून मला मार्गदर्शन करत आहे, मला प्रेरित करत आहे. ती खऱ्या अर्थाने हिरो आहे. तिनं तिच्या परीने माझा हा प्रवास जितका सोपा होईल तितका सोपा करण्याचा प्रयत्न केला. माझं मनोबल वाढवलं आणि प्रत्येक टप्प्यावर मला दिलासा दिला. तिचे अनुभव माझ्यासाठी जीवनाचे धडे ठरले. तिचं प्रेम आणि दयाळूपण हे माझ्यासाठी आदर्श ठरले, आणि तिचं धैर्य हे माझं सर्वात मोठं ध्येय बनलं. आम्ही दोघी मैत्रिणी झालो, आणि आमचे वेगवेगळे अनुभव एकमेकांबरोबर शेअर केले. या प्रवासात एकदाही तिनं मला एकटं वाटू दिलं नाही. ती सगळ्या अडचणींमधून बाहेर आली, आणि ती नेहमीच मला हे जाणवून देत होती की मीसुद्धा यातून बाहेर येईन. प्रिय महिमा, तू नेहमी अशीच सुंदर व्यक्ती बनून राहा. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.” अशा आशयाची पोस्ट हिनाने महिमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिली आहे.

हेही वाचा…“अरबाज बोंबलत सुटला थप्पड मारली…”, निक्कीला कानशि‍लात लगावल्याप्रकरणी सुरेखा कुडचींचा सवाल, म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिना खान ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अक्षराच्या भूमिकेतून घराघरांत पोहोचली. ‘बिग बॉस’च्या ११व्या सीझनमध्ये ती टॉप २ मध्ये पोहोचली होती. ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्येही ती सहभागी झाली होती. काही म्युझिक व्हिडिओंमध्येही ती झळकली आहे