‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील स्पर्धक व लोकप्रिय मराठी अभिनेता निखिल राजेशिर्के वैयक्तिक आयुष्यात नवीन प्रवासाला सुरुवात करतोय. ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘रंग माझा वेगळा’, ‘अजूनही बरसात आहे’ या गाजलेल्या मालिकांचा भाग राहिलेला निखिल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे.

हिंदी व मराठी अभिनयविश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. अनेक कलाकरांच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. लोकप्रिय मराठी अभिनेता निखिल राजशिर्केदेखील आयुष्याची नवी इनिंग सुरू करतोय. निखिलच्या लग्नाआधीच्या विधी सुरू आहेत. त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे, ज्यात त्याच्या लग्नाला फक्त तीन दिवस बाकी आहेत, असं लिहिलेलं दिसतंय. तसेच त्याच्या स्टोरीमधील आणखी एका व्हिडीओत त्याचा हळदी समारंभ पार पडत असल्याचं दिसतंय.

हेही वाचा – लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर

nikhil rajeshirke wedding
निखिल राजशिर्केने पोस्ट केलेली स्टोरी (सौजन्य – इन्स्टाग्राम)

निखिल राजेशिर्केच्या होणाऱ्या पत्नीचे नाव चैत्राली मोरे आहे. निखिल व चैत्राली यांनी नुकतंच प्री-वेडिंग शूट केलं. त्याच्या इन्स्टाग्रामवर प्री-वेडिंगचे फोटो पाहायला मिळत आहेत. या फोटोशूटसाठी निखिलने काळा सूट घातला, तर त्याच्या होणाऱ्या पत्नीने लाल रंगाची साडी नेसली आहे. दोघेही फोटोमध्ये सुंदर दिसत आहेत.

हेही वाचा – Bigg Boss फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, बाळाच्या नामकरण सोहळ्याला ३० हजार लोकांची उपस्थिती

निखिलने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर साखरपुडा उरकला होता. अभिनेत्री रेश्मा शिंदेने त्याच्या साखरपुड्याचा फोटो शेअर केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निखिलच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत त्याने नेहा म्हणजेच अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या ऑनस्क्रीन पहिल्या पतीची भूमिका साकारली होती. निखिल बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाला होता. मात्र पहिल्याच आठवड्यात तो एलिमिनेट झाला होता.