छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मृणाल दुसानीस ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘माझिया प्रियाला प्रित कळेना’ या मालिकेतून मृणाल घरा घरात पोहोचली. मृणालने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. गेली जवळपास दोन वर्ष मृणाल छोट्या पडद्यापासून दूर आहे. २०१६मध्ये तिने नीरज मोरेशी लग्न केलं. तिला आता एक गोड मुलगी आहे. दिवाळीनिमित्त मृणालने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे कुटुंबासह काही खास फोटो शेअर केले आहेत.

आणखी वाचा – Photos : खऱ्या आयुष्यात प्रथमेश परबला मिळाली प्राजू? गर्लफ्रेंडबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

आई झाल्यानंतर मृणालने काही काळ तरी कलाक्षेत्रापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असावा. ‘सुखांच्या सरींनी मन हे बावरे’ ही मृणालची शेवटची मालिका. या मालिकेनंतर मृणाल छोट्या पडद्यावर दिसलीच नाही. पण सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते.

मृणालने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये ती तिच्या पती व मुलीसह दिसत आहे. पण यामधील मृणालचा बदलता लूक थक्क करणारा आहे. तिने केस कापले आहेत. शिवाय तिचा अगदी साधा व सरळ लूक यामध्ये पाहायला मिळत आहे. तिने फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – Video : सलमान, शाहरुखच्या बंगल्यालाही मागे टाकेल अंकिता लोखंडेचं सासरचं घर, व्हिडीओ पाहून नेटकरीही चक्रावले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मृणालचा हा नवा लूक विशेष लक्षवेधी ठरत आहे. मृणालने २०१६ मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर नीरज मोरेसोबत लग्नगाठ बांधली. नीरज आणि मृणाल हे दोघेही सध्या अमेरिकेमध्ये राहत आहेत. मृणालने यावर्षी २४ मार्च रोजी मुलीला जन्म दिला.