झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर या कलाकारांच्या भूमिका पाहायला मिळाल्या. याच मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे काजल काटे. ती आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. काजलचा आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाशी खास संबंध असल्याचे समोर आले आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेला विशेष पसंती मिळाली होती. या मालिकेत काजल काटेने शेफाली हे पात्र साकारलं होतं. या मालिकेत शेफाली ही नेहाची सहकारी आणि खास मैत्रीण असल्याचे पाहायला मिळाले. काजल ही क्रिकेटप्रेमी आहे. विशेष म्हणजे काजलचे आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाशी खास कनेक्शन आहे.
आणखी वाचा : “…मग माझ्याच बाबतीत असं का घडावे”, प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली “या जन्मी नातेवाईक…”

अभिनेत्री काजल काटे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी तिच्या पतीसोबतच विविध फोटो शेअर करताना दिसते. काही महिन्यांपूर्वी काजलने तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पतीचा फोटो पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतरच तिचे मुंबई इंडियन्स संघाशी खास कनेक्शन समोर आले होते.

काजलच्या पतीचे नाव प्रतिक कदम असे आहे. काजलचा पती हा मुंबई इंडियन्स संघाचा फिटनेस कोच आहे. तो मुंबई इंडियन्स संघातील सर्व खेळाडूंना फिट ठेवण्याचे काम करतो. विशेष म्हणजे काजललाही क्रिकेटची प्रचंड आवड आहे. ती अनेकदा मैदानात जाऊन सामना पाहते. त्याचे अनेक फोटोही ती शेअर करताना दिसते.

आणखी वाचा : Video : “मला वेड लागले प्रेमाचे…” मानसी नाईकचा प्रसिद्ध रिल स्टारबरोबरचा व्हिडीओ चर्चेत, चाहते म्हणाले “ही जोडी…”

आणखी वाचा : MPSC परीक्षेत राज्यात तिसरी आलेली दर्शना पवार नेमकी कोण? जाणून घ्या हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काजल ही मूळची नागपूरची आहे. तिने ‘डॉक्टर डॉन’, ‘स्वराज्यजननी जिजामाता’ अशा मालिकांमध्येही काम केलं आहे. “माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील ही भूमिका माझ्या करिअरला एक वेगळं वळण देणारी ठरली आहे. या भूमिकेमुळे लोक मला ओळखू लागले आहेत. अनेकजण मला मेसेज, कॉल करून आवर्जून प्रतिक्रिया कळवतात.” अशी प्रतिक्रिया काजलने मालिकेदरम्यान दिलेल्या मुलाखतीवेळी दिली होती.