Ajinkya Raut Dance on Shaky Shaky Song: ‘गुलाबी साडी’, नऊवारी, ‘बुलट वाली, झुमका, डिंपल अशा गाण्यांसाठी संजू राठोड ओळखला जातो. ही गाणी सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच त्याचे ‘शेकी’ हे गाणे प्रदर्शित झाले आणि या गाण्यानेसुद्धा सध्या धुमाकूळ घातला आहे.
सोशल मीडियावर हे गाणे ट्रेंडिंगला असल्याचे दिसत आहे. या गाण्यावर सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण रील्स बनवताना दिसत आहेत. अनेक कलाकारांनीदेखील याआधी गाण्यावर डान्स करीत सोशल मीडियावर शेअर केल्याचे पाहायला मिळाले. आता एका अभिनेत्याने या गाण्यावर डान्स करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
‘मन उडू उडू झालं’ या गाजलेल्या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसलेला अभिनेता अजिंक्य राऊतने ‘शेकी’ गाण्यावर डान्स केला आहे. अभिनेत्याने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमधील त्याच्या हावभावाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. डान्स करताना तो एका ठिकाणी स्टेप चुकल्याचेदेखील दिसत आहे. मात्र, त्याने न थांबता डान्स सुरू ठेवला व त्याच्या हावभावांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
हा व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले, रोमँटिक वातावरण असे कॅप्शन दिले आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करीत त्याचे कौतुक केले आहे. तर अभिनेता चैतन्य सरदेशपांडेने ‘काय होतंय रे’ अशी मजेशीर कमेंट केली आहे. त्यावर अजिंक्यने हा वातावरणाचा परिणाम आहे, अशा आशयाची कमेंट करत उत्तर दिले आहे. चैतन्य सरदेशपांडे सध्या ठरलं तर मग या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत दिसत आहे.
नेटकरी काय म्हणाले?
अजिंक्यच्या या व्हिडीओर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट करीत कौतुकाचा वर्षाव केला आहे. “कमाल”, “एक नंबर”, “हे खूप छान आहे. तू डान्सचे व्हिडीओ नेहमी पोस्ट करत राहा”, “मी या गाण्यावरील तुझ्या डान्स व्हिडीओची वाट पाहत होते”, “तुझे हावभाव खूप सुंदर आहे”, “वाह!मस्त भाऊ”, “भावा, खूप छान. खासकरुन जेव्हा तू मध्येच स्टेप विसरलास, तेव्हाचे तुझे चेहऱ्यावरील हावभाव खूप छान होते”, “क्यूट”, “छान”, “गाण्यातील डिंपलवाली जी ओळ आहे, ती तुझ्याचसाठी आहे”, अशा अनेक कमेंट करीत चाहत्यांनी अभिनेत्याचे कौतुक केले आहे.



दरम्यान, अभिनेता अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतो. विविध विषयांवर त्याची मते मांडताना दिसतो. आता आगामी काळात तो कोणत्या भूमिकेत दिसणार, हे पाहणे महत्वाचे आहे.