scorecardresearch

‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेता सोशल मीडियावर मागतोय नोकरी; बायोडेटा शेअर करत म्हणाला…

अभिनेता अजिंक्य राऊतने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेता सोशल मीडियावर मागतोय नोकरी; बायोडेटा शेअर करत म्हणाला…
अजिंक्य राऊतने शेअर केलेली पोस्ट चर्चेत. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

झी वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका लोकप्रिय ठरली होती. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. अभिनेत्री ऋता दुर्गुळे या मालिकेत मुख्य भूमिकेत होती. तर प्रमुख नायकाची भूमिका अभिनेता अजिंक्य राऊत याने साकारली होती.

अजिंक्य राऊत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने त्याचा बायोडेटाच दिला आहे. नाव, उंची, भाषा, शहर अशी स्वत:बद्दलची माहिती त्याने शेअर केली आहे. या व्हिडीओला त्याने “मला नोकरी देऊ इच्छिता का?” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा>> Video : “कानफाड फोडेन, चल निघ” अपूर्वा नेमळेकरने मारण्यासाठी हात उगारताच विकास सावंत संतापला; भांडणाचा व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा>>“तुम्हाला परकं…” ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर अभिनेता भावूक

अजिंक्यने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. एकाने कमेंट करत “हो का नाही” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसऱ्याने “तुम्ही हिंदीमध्ये काम करा. चांगले कलाकार आहात” असा सल्लाही दिला आहे.

हेही वाचा>> “मी त्याची…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारासाठी श्रेया बुगडेची खास पोस्ट

अजिंक्य राऊत विठू माऊली या मालिकेतही झळकला होता. परंतु, मन उडू उडू झालं या मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 20:27 IST

संबंधित बातम्या