scorecardresearch

Video : “कानफाड फोडेन, चल निघ” अपूर्वा नेमळेकरने मारण्यासाठी हात उगारताच विकास सावंत संतापला; भांडणाचा व्हिडीओ व्हायरल

अपूर्वा नेमळेकर व विकास सावंतमध्ये तुफान राडा; भांडणाचा व्हिडीओ व्हायरल

Video : “कानफाड फोडेन, चल निघ” अपूर्वा नेमळेकरने मारण्यासाठी हात उगारताच विकास सावंत संतापला; भांडणाचा व्हिडीओ व्हायरल
बिग बॉसच्या घरातील अपूर्वा नेमळेकर व विकास सावंतच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल. (फोटो: कलर्स मराठी)

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व दिवसेंदिवस अधिक रंजक होत चाललं आहे. रोहित शिंदेने घरातून एग्झिट घेतल्यानंतर आता बिग बॉसला या पर्वाचे टॉप १० फायनलिस्ट मिळाले आहेत. परंतु, खेळ जसजसा पुढे जात आहे, तसतसे घरातील सदस्यांमध्ये खटके उडाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील अपूर्वा नेमळेकर व विकास सावंत यांच्यातील भांडणाचा व्हिडीओ समोर आला आहे.

‘बिग बॉस’च्या घरात अपूर्वा व विकासमध्ये चांगली मैत्री झाल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु, आता त्यांच्यात कडाक्याचं भांडण झाल्याचं दिसत आहे. कलर्स मराठीच्या ऑफिशिअल पेजवरुन त्यांच्यातील भांडणाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अपूर्वा व विकास एकमेकांवर आवाज चढवताना दिसत आहेत.

हेही वाचा>> “तुम्हाला परकं…” ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर अभिनेता भावूक

अपूर्वा व्हिडीओमध्ये विकासला “मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही आहे. कळत नाही का तुला” असं जोरात म्हणताना दिसत आहे. त्यावर विकास “मग माझं नाव कशाला घेतलं” असं म्हणतो. यावर अपूर्वा “चल रे निघ” असं मोठ्याने विकासला म्हणते. विकासचाही राग अनावर होऊन मग तोही अपूर्वाला “तू पण निघ. जाऊन बस तिथे”, असं म्हणतो. त्यानंतर त्यांच्यातील वाद वाढत जाऊन अपूर्वा विकासवर हात उगारत “कानफाड फोडेन” असं म्हणते.

हेही वाचा>>“मी त्याची…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारासाठी श्रेया बुगडेची खास पोस्ट

हेही पाहा>> Photos: अपूर्वा नेमळेकर की राखी सावंत? कोण मारणार बाजी? पाहा ‘बिग बॉस मराठी’तील टॉप १० स्पर्धकांची यादी

अपूर्वा व विकासमधील भांडण सोडवण्यासाठी घरातील सदस्यही एकत्र जमल्याचं दिसत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील अपूर्वा-विकासमधील भांडणाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 19:50 IST

संबंधित बातम्या