कॉमेडियन कपिल शर्माचा शो खूप प्रसिद्ध आहे. अनेक कलाकार आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी आणि मुलाखतींसाठी या शोमध्ये येतात. यंदा कपिलच्या शोमध्ये ९० च्या दशकातील तीन सुप्रसिद्ध अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. या शोमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर, मंदाकिनी आणि संगीता बिजलानी सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा- परिणीती चोप्राच्या नवऱ्याचा ‘एवढा’ आहे मासिक पगार; खुद्द राघव चड्ढा यांनी केला होता खुलासा

कपिलच्या शोमध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्री वर्षा उसगावकर, संगीता बिजलानी आणि मंदाकिनी यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. मात्र या सगळ्यात चर्चेचा विषय ठरल्या त्या ‘राम तेरी गंगा मैली’ फेम मंदाकिनी. मंदाकिनींना कपिलने एक प्रश्न विचारला आणि त्यानंतर मुलाखत चांगलीच रंगली. सध्या सोशल मीडियावर त्याचा प्रोमो व्हायरल झाला आहे.

कपिलने मंदाकिनींना त्यांचा सर्वाधिक चर्चेतील चित्रपट ‘राम तेरी गंगा मैली’बाबत प्रश्न विचारला. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कपूर यांनी केले होते. त्यामध्ये राज कपूर यांचा मुलगा राजीव कपूर प्रमुख भूमिकेत होते. ‘राम तेरी गंगा मैली’मध्ये मंदाकिनी यांनी बोल्ड सीन दिले होते. त्यामुळे हा चित्रपट वादात सापडला होता.

यावेळी कपिलनं त्या गोष्टीचा उल्लेख करताना म्हटलं की, मंदाकिनी यांना सगळेजण ओळखतात. त्यांचा राम तेरी गंगा मैली नावाचा चित्रपट खूप चर्चेत आला होता. त्यानंतर त्यांची लोकप्रियता देखील खूप वाढली होती. लग्न झालेली पुरुष मंदाकिनीचं पोस्टर घरात लावायला घाबरायची. तर काही जण पाकिटात पत्नीच्या फोटोमागे मंदाकिनी यांचा फोटो लपवून ठेवायचे. अशातच जेव्हा पत्नी विचारायची, मंदाकिनी नावाची अभिनेत्री आली आहे तुम्ही तिला पाहिलं का, त्यावेळी नवरा म्हणायचा मी नाही पाहिले. त्यावर बायको म्हणायची मीही तुमचं पाकीट उघडलं तेव्हाच तिला बघितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कपिलने असं म्हणताच मंदाकिनी खूप लाजल्या. एवढंच नाही तर मंदाकिनींबरोबर वर्षा उसगांवकर आणि संगीता बिजलानीही लाजल्या. सोशल मीडियावर या आगामी शोचा प्रोमो व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.