लोकप्रिय अभिनेत्री मंदिरा बेदीचा आज वाढदिवस आहे. वयाच्या पन्नाशीतही फिटनेसकडे विशेष लक्ष देणारी मंदिरा तिच्या हॉट फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘औरत’ अशा मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमटवणारी मंदिरा चित्रपटांतही झळकली आहे. छोट्या पडद्यावर अभिनयाची जादू करणारी मंदिरा क्रिकेटच्या मैदानातही दिसून आली.

मॅचनंतर क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेटर्सच्या मुलाखती घेणाऱ्या मंदिराने या क्षेत्रातील अनेक गोष्टींचा खुलासा एका मुलाखतीत केला होता. २००३ ते २००७ काळात आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान मंदिराने मैदानावर आलेल्या वाईट अनुभवांबद्दल भाष्य केलं होतं. “मी एका वेगळ्याच जगातून आले आहे, असं क्रिकेटर्सला वाटायचं. जे मनात येईल ते विचार, असं मला चॅनेलने सांगितलं होतं. पण मला काहीच समजत नाही, या नजरेने मला क्रिकेटर्स पाहायचे,” असं मंदिराने सांगितलं होतं.

हेही वाचा>> “माझं न्यूड फोटोशूट पाहून मित्राने फोन केला अन्…”, वनिता खरातने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “तो फोटो फ्रेम करून…”

“सोनी टीव्हीने १५०-२०० महिलांमधून माझी निवड केली होती. त्यामुळे मी आनंदी होते. मला काहीतरी चांगलं बोललं पाहिजे, असा मी विचार करायचे. पण क्रिकेटर्स माझ्याकडे नेहमी वाईट नजरेने पाहायचे,” असा खुलासा मंदिराने केला होता. क्रिकेटच्या मैदानावरील मंदिराच्या फॅशनची चर्चा रंगली होती. आयपीएलच्या उद्घाटन समारंभातही मंदिरा दिसून आली होती.

हेही वाचा>> लग्नानंतर १२ वर्षे आई होऊ शकली नव्हती मंदिरा बेदी, मनोरंजनसृष्टीला जबाबदार धरत म्हणालेली, “हे क्षेत्र क्रूर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंदिरा बेदीने वैयक्तिक आयुष्यातही अनेक गोष्टींचा सामना केला आहे. १९९९मध्ये चित्रपट दिग्दर्शक राज कौशलशी लग्न केलं. मात्र तिला आई होण्यासाठी मंदिराला तब्बल १२ वर्षे वाट पाहावी लागली. २०११ मध्ये मंदिराने वीर या मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिने एका मुलीला दत्तक घेतले. तिच्या मुलीचे नाव तारा असे आहे. दरम्यान, मंदिराचा पती राज कौशलचं ३० जून २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.