महाराष्ट्रातील लाखो महिलांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून होम मिनिस्टरला ओळखले जाते. दार उघड बये दार उघड म्हणत सुरु झालेला ‘होम मिनिस्टर’चा हा प्रवास आता २०व्या वर्षात पदार्पण करत आहे. होम मिनिस्टरचा पहिला भाग १३ सप्टेंबर २००३ रोजी प्रदर्शित झाला होता. आता या निमित्ताने अभिनेते आदेश बांदेकर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

आदेश बांदेकर यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत होम मिनिस्टरची संपूर्ण टीम पाहायला मिळत आहे. याला त्यांनी हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “राज ठाकरेंच्या घरी गेलो तेव्हा…”, कोकण हार्टेड गर्लने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली “ते मुख्यमंत्री…”

“होम मिनिस्टरच्या प्रवासात साथ सोबत करणारी झी मराठीची टिम…यांच्यामुळेच हि आनंदयात्रा सुखकारक होते… धन्यवाद झी मराठीला आणि मायबाप रसिक प्रेक्षकांना”, असे आदेश बांदेकरांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “…म्हणून मी बाजूला झाले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतण्याबद्दल विशाखा सुभेदार यांचं स्पष्ट वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान होम मिनिस्टर हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय आहे. गेल्या १९ वर्षांपासून अविरतपणे हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हा कार्यक्रम सादर करणारे सूत्रसंचालक आदेश बांदेकर हे ‘भावोजी’ म्हणून घराघरात लोकप्रिय झाले आहेत. या कार्यक्रमाने जवळपास १० लाख किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास, ६००० भाग आणि १२००० घर इतका मोठा पल्ला गाठला आहे.