मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सोशल मीडिया पोस्ट, इन्स्टाग्राम स्टोरीजच्या माध्यमांतून हे कलाकार चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. तसेच अनेकदा सामाजिक, राजकीय विषयांवर हे कलाकार उघडपणे आपले मत मांडतात. सध्या अशाच एका मराठी अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्याचा लहान मुलगा स्वयंपाक करायला शिकत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला अभिनेत्याने अतिशय सुंदर असे कॅप्शन दिले आहे.

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’ फेम अभिनेत्रीची ‘ठरलं तर मग’ मालिकेत पुन्हा एन्ट्री, जुई गडकरीने शेअर केला नवीन प्रोमो

मराठी अभिनेता अभिजीत केळकर गेली अनेक वर्ष छोट्या पडद्यावरील मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सध्या अभिजीत सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. अभिनेत्याने त्याचा लहान मुलगा मल्हारचा स्वयंपाक शिकतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये छोटा मल्हार चपात्या लाटत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक कलाकार मंडळी आणि नेटकऱ्यांनी मल्हारचे कौतुक केले आहे.

हेही वाचा : “मराठी चित्रपटसृष्टीचा सार्थ अभिमान”, ‘वेड’ चित्रपटाने रचला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, रितेश देशमुखने शेअर केला खास व्हिडीओ

अभिजीत केळकरने या व्हिडीओला “खरे संस्कार मुलांवर (पुरुषांवर) करण्याची गरज आहे आणि ती सुरुवात आपल्या घरापासूनचं व्हायला हवी” असे सुंदर कॅप्शन देत समाजात एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. मुलींप्रमाणे मुलांनाही घरची विशेषत: स्वयंपाक घरातील सर्व कामं आली पाहिजेत असे अभिनेत्याला या व्हिडीओद्वारे सूचित करायचे आहे. यावर नेटकऱ्यांनी कमेंट करत अभिजीतसह त्याच्या लहान मुलाचे कौतुक केले आहे.

हेही वाचा : Video : “शेजारी नक्की काय चाललंय…”, प्रसाद ओकने शेअर केला हास्यजत्रेच्या सेटवरील मजेशीर व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेत्री अक्षया नाईकने “वाह दादा वाह सुंदर कॅप्शन” अशी कमेंट केली आहे. तर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरने ( कोकण हार्टेड गर्ल) या व्हिडीओवर “या वयात मला एवढं पण येत नव्हतं” अशी प्रतिक्रिया यावर दिली आहे. इतर काही युजर्सनी “खूपच गुणी मुलगा आहे”, “या वयात आम्हाला जेवण यायचं नाही”, “खूप छान दादा” अशा कमेंट मल्हारच्या व्हिडीओवर केल्या आहेत.