‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या नव्या पर्वाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद मिळतं आहे. या कार्यक्रमातील लिटिल चॅम्प्सनं त्यांच्या आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मागाच्या आठवड्यात ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ मंचावर अक्षरा आणि अधिपतीची हळद, लग्न वगैरे पाहायला मिळाल होतं. त्यानंतर या आठवड्यात या कार्यक्रमात मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हजेरी लावणार आहेत. यासंबंधीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये अशोक सराफ लिटिल चॅम्प्सच्या एका कृतीमुळे भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – “…तर मी ट्रॉफी जिंकले नसते”, अभिनेत्री मेघा धाडेनं बिग बॉसच्या आठवणींना दिला उजाळा

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या पर्वात परीक्षकाची भूमिका गायक, संगीतकार, दिग्दर्शक सलील कुलकर्णी आणि गायिका वैशाली माडे सांभाळत आहेत. तर या संपूर्ण गुरुकुलची जबाबदारी सुरेश वाडकर यांच्यावर आहे. अशातच या कार्यक्रमात अशोक सराफ हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. ‘झी मराठी’च्या इन्स्टाग्रामवर पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणावर आधारित चित्रपटाचं शूटिंग केव्हा सुरू होणार? प्रसाद ओकनं व्हिडीओ केला शेअर

या व्हिडीओत, अशोक सराफ यांच्यावर फुलांचा वर्षावर करून सर्व लिटिल चॅम्प्स त्यांचे पाय धुवून आशीर्वाद घेताना दिसत आहेत. हे प्रेम पाहून अशोक सराफ भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकरीनं लिहीलं आहे की, “खूप चांगलं उदाहरण आहे…म्हणतात ना इथेच करायचं आणि इथेच भोगायचं…हे फक्त वाईट हेतूने न घेता चांगल्या हेतूने पण घेता येत ते मामांनी दाखवलं…म्हणजेच काय त्यांनी आतापर्यंत प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पावती आज या स्वरुपात मिळतं आहे…ग्रेट मामा” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “माहित नाही काय जादू आहे या व्यक्तीमध्ये, यांना बघूनच मनात एक स्मित हास्य येतं. धन्य आहे आम्ही की सम्राट, विनोदाचे बादशहा माझे लहानपणापासूनचे सगळ्यात आवडते अभिनेते अशोक सराफ (मामा) या महाराष्ट्रात जन्माला आले.”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यापूर्वीच्या ‘झी मराठी’च्या इन्स्टाग्रावर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये अशोक सराफ कोणती अभिनेत्री तयार व्हायला सर्वात जास्त वेळ लावते? याचं उत्तर देताना पाहायला मिळाले होते. त्यामुळे आता येत्या काळात ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ मंचावर अशोक सराफ यांच्याबरोबरची धमाल-मस्ती पाहायला मिळणार आहे.