‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता चेतन वडनेरे सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. कारण आहे सोशल मीडिया. चेतनने नुकताच इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी सेशन’द्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तर चेतनने दिली.

अभिनेता चेतन वडनेरेला चाहत्यांनी त्याच्या लग्नाविषयी अधिक प्रश्न विचारले. २२ एप्रिलला चेतनने अभिनेत्री ऋजुता धारप हिच्याशी मोठ्या थाटामाटात लग्न केलं. चेतनच्या लग्नाची पूर्व कल्पना कोणालाच नव्हती. सोशल मीडियावर त्याने फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. त्यामुळे चाहत्यांनी त्याला ‘आस्क मी सेशन’मध्ये लग्नासंबंधित अनेक प्रश्न विचारले.

हेही वाचा – “संधीचं सोनं करणं म्हणजे”, ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्याने नम्रता संभेरावच्या ‘नाच गं घुमा’मधील कामाचं केलं भरभरून कौतुक, म्हणाला…

एका चाहत्याने विचारलं की, लग्न नाशिकमध्ये कोणत्या ठिकाणी झालं? यावेळी अभिनेत्याने त्या संबंधित स्थळाचं अकाउंट दिलं. दुसऱ्या चाहत्याने लग्नानंतरच्या फोटोची मागणी केली. तेव्हा चेतनने गृहप्रवेशाचा सुंदर फोटो शेअर केला.

याशिवाय एका चाहत्याने खटकणारा प्रश्न विचारला. त्याने विचारलं, “ऋजुता लग्न झालं तरी साडी वगैरे नेसत नाही का? किती छान मुली सारखं वागणूक देत आहेत तुमचे मम्मी पप्पा.” यावर चेतनने चांगल्याच शब्दात सडेतोड उत्तर त्या चाहत्याला दिलं. चेतन म्हणाला, “धन्यवाद. पण लग्नाचा आणि साडीचा खरंतर संबंध नाहीये. माझ्या नऊवारी नेसणाऱ्या आजीने माझ्या सहावारी नेसणाऱ्या आईला समजून घेतलं. तसंच माझ्या सहावारी नेसणाऱ्या आईने पंजाबी ड्रेस आणि जीन्स-टॉप घालणाऱ्या माझ्या बायकोला समजून घेतलं आहे. कोणते कपडे वापरायचे ही ज्याची त्याची आवड असते, लग्नाआधी असो किंवा लग्नानंतर…कपडे घालणं हे केवळ फॅशनचा भाग आहे.”

हेही वाचा – ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्याने लग्नाला इंडस्ट्रीतील कलाकारांना का आमंत्रण दिलं नाही? स्वतः खुलासा करत म्हणाला…

चेतनची थोडक्यात लव्हस्टोरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेतन व ऋजुताची ओळख ‘झी युवा’ वाहिनीवर ‘फुलपाखरू’ मालिकेत झाली होती. त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली. कालांतराने या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. चेतन व ऋजुता मूळचे नाशिकचे असल्यामुळे नाशिक प्रेमाने दोघांना आणखी जवळ आणण्यास मदत केली. दोघांमध्ये ५ वर्षांचं अंतर असल्याचं चेतनने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

दरम्यान, चेतनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेपूर्वी ‘लेक लाडकी या घरची’, ‘अलटी पलटी सुमडीत कलटी’, ‘काय घडलं त्या रात्री’ या मालिकांमध्ये काम केलं होतं. या मालिकांमधील चेतनच्या भूमिकांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती.