‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर कायमच चर्चेत असतात. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणून त्यांना ओळखले जाते. लग्नानंतर आता काही दिवसांपूर्वी अक्षयाच्या मंगळागौरीचा कार्यक्रम थाटात पार पडला. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हार्दिक आणि अक्षयाची लग्नानंतरची ही पहिली मंगळागौर होती. त्यामुळे त्या दोघांनीही यासाठी जय्यत तयारी केली होती. यावेळी अक्षयाने मंगळागौरीसाठी विशेष तयारी केली होती. तिने पूजेसाठी तिने खास हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. हिरव्या बांगड्या, भरजरी दागिने, नाकात नथ, केसात गजरा असा पारंपरिक शृंगारही तिने केला होता.
आणखी वाचा : नऊवारी साडी, केसात गजरा अन्…; राणादाने ‘अशी’ पूर्ण केली पाठकबाईंच्या मंगळागौरीची हौस

या मंगळागौरीच्या कार्यक्रमावेळी अक्षयाने नवऱ्यासाठी खास उखाणा घेतला. त्याचा व्हिडीओही समोर आला होता. आता याच कार्यक्रमात हार्दिकनेही अक्षयासाठी खास उखाणा घेतल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी हार्दिकने चक्क पुष्पा स्टाईलने घेतलेल्या उखाण्याची चर्चा रंगली आहे.

आणखी वाचा : “लग्न वर्षभरही टिकणार नाही…”, जितेंद्र जोशीला लग्नानंतर मिळालेला सल्ला, आता १४ वर्षांनी म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“लग्नामध्ये घातली आम्ही एकमेकांना वरमाला, अक्षयाचं नाव घेतो झुकेगा नही साला”, अशा उखाणा यावेळी हार्दिक जोशीने घेतला. त्याचा हा उखाणा ऐकून अक्षयानेही हार्दिकचे कौतुक केले. त्याच्या या उखाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.