‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेली मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. गेल्या चार वर्षांपासून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अभिनेत्री गिरीजा प्रभू, मंदार जाधव, माधवी निमकर, वर्षा उसगांवकर अशी तगडी कलाकार मंडळी या मालिकेत पाहायला मिळाली. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचे दोन पर्व झाले. या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

कोठारे व्हिजन यांची निर्मिती असलेल्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या पहिल्या पर्वात गौरी-जयदीपची कथा आणि दुसऱ्या पर्वात गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा पाहायला मिळाली होती. २० नोव्हेंबर २०२३ला मालिकेचं दुसरं पर्व सुरू झालं; ज्यात २५ वर्षांचा लीप दाखवला. गौरी, जयदीप, माई, शालिनी व्यतिरिक्त सगळे नवे चेहर पाहायला मिळाले. अभिनेता अमेय बर्वे, हर्षदा खानविलकर, गिरीश ओक, मयुर पवार यांची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत एन्ट्री झाली. अखेर शालिनीचा बदला घेऊन गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा संपुष्टात आली. २२ डिसेंबरला ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

हेही वाचा – गौतमी पाटीलची आता छोट्या पडद्यावर जबरदस्त एन्ट्री, ‘या’ लोकप्रिय कार्यक्रमात पाहायला मिळणार

त्यानंतर ‘सुख म्हणजे नक्की असतं’ मालिकेची सक्सेस पार्टी पार पडली. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आले आहेत. कोठारे व्हिजनच्या इन्स्टाग्राम पेजवर सक्सेस पार्टीचे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. एका व्हिडीओमध्ये महेश कोठारे ‘झपाटलेला’ चित्रपटातील ‘तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर ‘सुख म्हणजे म्हणजे नक्की असतं’ मालिकेतील कलाकार डान्स करताना पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा – Video: अखेर ‘बिग बॉस मराठी ४’ विजेता अक्षय केळकरची गर्लफ्रेंड ‘रमा’ आली समोर, अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

हेही वाचा – Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठीनंतर आणखी दोन सदस्य घराबाहेर; कशिश कपूर ढसाढसा रडत म्हणाली, “इथे प्रत्येकजण साप…”

तसंच दुसऱ्या व्हिडीओमध्ये मालिकेतील कलाकार ‘तांबडी चामडी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. मंदार जाधव, मयुर पवार, संजय पाटील, मृण्मयी गोंधळेकर, अर्पणा गोखले हे सगळे कलाकार या व्हिडीओंमध्ये धमाल करताना पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by We@KothareVision (@kotharevision)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका सध्या रात्री ११ वाजता प्रसारित होतं आहे. पण, या मालिकेची जागा ‘अबोली’ मालिका घेणार आहे. कारण ‘अबोली’ मालिकेच्या वेळेत म्हणजे रात्री १०.३० वाजता २३ डिसेंबरपासून ‘तू ही रे माझा मितवा’ ही नवीन मालिका पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका बंद होणार आहे.