प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या परखड मत मांडण्यासाठी देखील ओळखले जातात. शरद पोंक्षे हे सध्या सावरकरांच्या विचारांचा जागर करत महाराष्ट्रभर व्याख्यान देत आहेत. याचदरम्यान शरद पोंक्षेंनी सांगलीतील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजींची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्या पोस्टने लक्ष वेधलं आहे.

शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. नुकतंच शरद पोंक्षे यांनी संभाजी भिडे यांची भेट घेतली आहे. याचे काही फोटोही त्यांनी पोस्ट केले आहेत. यात त्यांनी संभाजी भिडेंचे कौतुक केले आहे.
आणखी वाचा : पत्रास कारण की… टिकली! भिडे आजोबांना नातीने लिहिलेलं खुलं पत्र

“आज मिरजेत सायं व्याख्यान आहे तेव्हा सकाळी सांगलीत मा.भिडेगुरूजींना भेटण्याचा योग आला. ते तरुणांकडून व्यायाम व मारूतीची ऊपायना सुर्यनमस्कार करून घेत होते.छ शिवाजीमहाराज तरूणांना समजाऊन सांगण्यासाठी संपुर्ण आयुष्य खर्च करणारे मा भिडे गुरूजी अशी माणसं आहेत म्हणून हिंदू धर्माचं कार्य सुरू आहे”, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

आणखी वाचा : “कपाळावर आठ्या पाडून महाराजांची भूमिका साकारणारे…” ‘रावरंभा’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध मराठमोळ्या दिग्दर्शकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

शरद पोंक्षे यांनी शेअर केलेल्या या फोटोत अभिनेत्री राधिका देशपांडेही पाहायला मिळत आहे. त्यामुळे शरद पोंक्षेंची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. यावर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहे. तर काहींनी यावर टीकाही केली आहे.

आणखी वाचा : “कार दरीत कोसळल्यानंतर वैभवी उपाध्याय जीव वाचवण्यासाठी करत होती धडपड, पण…”; पोलिसांनी सांगितला सविस्तर घटनाक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘टिकली लावली नाही’ म्हणून एका महिला पत्रकाराचा अनादर केला होता. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यावेळी त्यांच्यावर चांगलीच टीका झाली होती.