मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार विविध कारणांमुळे सतत चर्चेत असतात. ते कायमच सामाजिक तसेच राजकीय मुद्द्यांवर भाष्य करताना दिसतात. नुकतंच अभिनेता शशांक केतकर हा एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे.

मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून शशांक केतकरला ओळखले जाते. तो कायमच सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करताना दिसतो. नुकतंच शशांकने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो एका बस स्थानकावरील आहे. त्यात रांगेत उभे राहण्याचे आवाहन प्रवाशांना करण्यात आले आहे.
आणखी वाचा : “सर्वांची नजर माझ्यावर” शशांक केतकरच्या ‘त्या’ फोटोवर पत्नीची कमेंट, म्हणाली “आणि तुझी…”

मात्र त्यावर रांगेत उभे राहिलेल्या पेंग्विनचा फोटो दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्याने टोला लगावला आहे. “आता मला खरं खरं सांगा… bus stop वर रांगेत उभे राहा, हे सांगण्यासाठी penguin वापरायची काय गरज होती”, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.

त्याबरोबरच त्याने #smart #witty #politics #maharashtra असे हॅशटॅगही वापरले आहेत. शशांकच्या या फोटोवर अभिनेता समीर खांडेकरने कमेंट केली आहे. त्याने “कारण, आबा ऐकणार नाहीत”, असे म्हटले आहे.

shashank ketkar comment
शशांक केतकरच्या पोस्टवरील कमेंट

आणखी वाचा : “‘बाईपण भारी देवा’मध्ये माझ्याबरोबर झळकलेली ती मुलगी…”, अखेर सोहम बांदेकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाला, “आई माझ्यावर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान शशांकच्या या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. “कारण आजकाल लोकांना शिस्तीत राहायला शिकवायची खूप गरज आहे..आता तर माणसांना प्राण्यांकडून शिकण्याची गरज आहे..मग ते मुंगी असो किंवा पेंग्विन…”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “मुंग्या पाहिजे होत्या”, असे म्हटले आहे.