स्टार प्रवाहवरील सर्वच मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नात्यांचं महत्त्व पटवून देणाऱ्या कथानकावर आधारित असलेली ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या कलाकारांनी नुकतंच सेटवरचा शेवटचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावेळी ते सर्वजण भावुक झाल्याचे पाहायला मिळालं. नुकतंच अभिनेते सुनील बर्वे यांनी या मालिकेबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

सुनील बर्वे यांनी ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत सुर्या मोरे ही भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांनीही पसंती दिली होती. नुकतंच सुनील बर्वे यांनी इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी शर्ट आणि काही वस्तूंची झलक दाखवली आहे.
आणखी वाचा : “हा अधिक श्रावण आहे, यानंतर श्रावण लागेल”, चाहत्याच्या कमेंटवर प्रथमेश लघाटेने दिलं उत्तर, म्हणाला “तुमच्या माहितीसाठी…”

सुनील बर्वेची पोस्ट

“ह्या कपड्यांमधून बाहेर पडणं खूप त्रासदायक होतं. ८/०२/२०२० रोजी पहिल्यांदा आणि २०/०७/२०२३ रोजी मी ते शेवटचे परिधान केले. ह्या सुर्यादादा पात्राला खूप प्रेम दिलं प्रेक्षकांनी, आणि सहकलाकारांनी!

माझ्या कारकिर्दितली अजून एक प्रिय, महत्वाची मालीका! अत्यंत जड मनाने मी ह्या पेहेरावाला निरोप दिला. पुन्हा नवं काही सुरू होईलंच, त्याच्या प्रतिक्षेत असे पर्यंत हा, गेल्या साडे तीन वर्षांचा काळ मनात घुमत राहील!!”, असे सुनील बर्वे यांनी म्हटले आहे.

दरम्यान ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेच्या सेटवरील काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीने याचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

आणखी वाचा : “त्यांनी वडा खाल्ला आणि…” ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“लवकरच स्टार प्रवाहच्या सहकुटुंब सहपरिवार मालिकेचे १००० भाग पूर्ण होत आहेत. या १००० भागांचा टप्पा पूर्ण करत मालिकेचा गोड शेवट होणार आहे. आज या चित्रिकरणाच्या शेवटच्या दिवसानिमित्ताने मालिकेच्या संपूर्ण टिमने एकत्र येत हा क्षण साजरा केला”, असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे.