मराठी मालिकांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत सुयश टिळकने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सुयशने त्याच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. ‘का रे दुरावा’, ‘दुर्वा’, ‘पुढचं पाऊल’, ‘बंध रेशमाचे’ यांसारख्या मालिकांमधील त्याच्या भूमिका प्रचंड गाजल्या. सध्या तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. सुयशने त्याच्या खासगी आयुष्याबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एक खुलासा केला आहे.

‘प्लॅनेट मराठी’च्या ‘त्या नंतर सगळं बदललं’ या कार्यक्रमात सुयशने त्याच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं. सुयशने यावेळी त्याच्या आयुष्यामध्ये घडलेल्या एक वाईट प्रसंगाबाबत सांगितलं. सुयशचा काही वर्षांपूर्वी अपघात झाला होता. यावेळी नशिबाने तो वाचला असं सुयशचं म्हणणं आहे.

आणखी वाचा – “तिच्या आयुष्यामध्ये दुसरं कोणीतरी आलं आणि…” एक्स गर्लफ्रेंड अक्षया देवधरबाबत सुयश टिळकचं भाष्य, म्हणाला, “आजही आमच्यामध्ये…”

आणखी वाचा – “मी वडिलांवर अंत्यसंस्कार केले आणि…” सई ताम्हणकरने सांगितली ‘ती’ कटू आठवण, म्हणाली, “त्यांचं निधन झालं तेव्हा…”

सुयश म्हणाला, “‘पुढचं पाऊल’ मालिकेचं मी चित्रीकरण करत होतो. पुण्यामधून मी येत होतो. दुसऱ्या दिवशी माझं चित्रीकरण होतं. एक्सप्रेस हायवेवरच माझा मोठा अपघात झाला. त्यावेळी मी अगदी साधा कलाकार होतो. ‘पुढचं पाऊल’मध्ये माझी अगदी छोटी भूमिका होती. या मालिकेत मृणाल देशपांडे व लाला देशमुख माझ्या आई-वडिलांची भूमिका साकारत होते. पण या मंडळींशी माझं उत्तम नातं जमलं होतं. अपघातामधून मी नशिबाने वाचलो होतो. त्या अपघातानंतर अचानक आयरिस प्रॉडक्शन, हर्षदा खानविलकर, मृणाल देशपांडे आणि अजून काही माणसं माझ्या खूप जवळची झाली”.

आणखी वाचा – “शेतीच करत राहिलो असतो तर…” ‘सैराट’नंतर तानाजी गालगुंडेने केली पायाची सर्जरी, म्हणाला, “माझे दोन्ही पाय…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कारण एक ते दिड महिना मी अंथरुणाला खिळलो होतो. त्या दिवसांमध्ये मी चित्रीकरण करत नाही असं मला या मंडळींनी कधीच जाणवू दिलं नाही. माझा उजवा डोळा गेला होता. या सगळ्या परिस्थितीमध्ये संपूर्ण मंडळींनी मला खूप पाठिंबा दिला. अपघातानंतर माझा चेहरा कधीच नीट होणार नाही असं मला वाटत होतं. कारण चेहऱ्यावर जखमा होत्या. पण हर्षदा खानविलकर, मृणाल देशपांडे या सगळया मंडळींनी मला अधिक बळ दिलं”. या अपघातानंतर सुयशने नव्या जोमाने पुन्हा कामाला सुरुवात केली होती.