असंख्य तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला मराठमोळा अभिनेता म्हणून सुयश टिळकला ओळखले जाते. सुयश टिळकने दोन वर्षांपूर्वी अभिनेत्री आयुषी भावेबरोबर लग्नगाठ बांधली. सुयश टिळकची पत्नी आयुषी ही एक उत्तम अभिनेत्री आणि डान्सर आहे. नुकतंच तिने सुयशबरोबर लग्न करण्याचा निर्णय का घेतला? याबद्दलचे कारण सांगितले आहे. सुयश टिळक आणि त्याची पत्नी आयुषी भावे-टिळक हे दोघेही कायमच चर्चेत असतात. नुकतंच त्या दोघांनी झी नाट्य गौरव पुरस्कार २०२३ ला हजेरी लावली. यावेळी ते दोघेही फारच आनंदात असल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत आयुषीने सुयशबरोबर लग्न का केलं? त्यामागचे कारण सांगितले आहे.आणखी वाचा : वनिता खरात २५ वर्षांपूर्वी कशी दिसायची? फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क "मी खरं तर विविध पुरस्कार सोहळ्याला जाण्यासाठी फारच उत्सुक असते. मला सुयशबरोबर विविध पुरस्कार सोहळ्याला जायला खूप आवडतं. त्यानिमित्ताने मला विविध कलाकारांना भेटता येतं. कारण इतर वेळी अनेक कलाकार हे कामात व्यस्त असतात. सुयश त्यांना किमान सेटवर तरी भेटतो. पण माझी त्यांच्याबरोबर भेट होत नाही. यानिमित्ताने ती भेट होते. यानिमित्ताने आम्ही दोघं एकमेकांबरोबर वेळही घालवतो. पण सुयश हा शूटला गेल्यानंतर बाहेर अजिबात टाईमपास करत नाही. तो शूटला जातो आणि पॅकअप झाल्यावर थेट घरी येतो. अजिबात फिरायला वैगरे जात नाही. त्यामुळे तो कामावरुन आल्यानंतर नेहमीच मला वेळ देतो. त्यामुळे तो मला वेळ देत नाही, अशी माझी तक्रार कधीच नसते. पण दिवसभर मला त्याची खूप आठवण येते", असे आयुषी म्हणाली. त्यावर तुझी बायको किती समजूतदार आहे, असे त्याला विचारले असता सुयशनेही "हो, म्हणून तर ती माझी बायको आहे", असे म्हटले. त्यावर आयुषीने ".म्हणूनच तर लग्न केलंय", असे मजेशीर पद्धतीने म्हटले. आणखी वाचा : एकेकाळी मुंबईच्या रेल्वे स्थानकावर झोपलेला ‘हा’ प्रसिद्ध मराठी अभिनेता, कारण… दरम्यान सुयश टिळक आणि आयुषी भावे यांनी २१ ऑक्टोबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. त्या दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आयुषीबरोबर लग्न करण्यापूर्वी सुयश हा अभिनेत्री अक्षया देवधरला डेट करत होता. त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र काही काळानंतर त्या दोघांचा ब्रेकअप झाला. आता अक्षया ही अभिनेता हार्दिक जोशीबरोबर विवाहबंधनात अडकली आहे.