scorecardresearch

“लोकांचा गैरसमज…” ‘फुलपाखरु’ मालिकेतील ‘मानस’ स्पष्टच बोलला

“मला चॉकलेट बॉयची इमेज ब्रेक करायची होती.”

“लोकांचा गैरसमज…” ‘फुलपाखरु’ मालिकेतील ‘मानस’ स्पष्टच बोलला
यशोमन आपटे

छोट्या पडद्यावरील चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला यशोमन आपटे सध्या चर्चेत आहे. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ या मालिकेत झळकताना दिसत आहे. यशोमनला ‘फुलपाखरु’ या मालिकेमुळे घराघरात नवी ओळख मिळाली. त्याने या मालिकेत ऋता दुर्गुळेबरोबर मानस हे पात्र साकारलं होतं. नुकतंच यशोमन आपटेने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. या पार्श्वभूमीवर त्याने या पात्राबद्दल भाष्य केले.

यशोमन आपटे हा घराघरात लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी यशोमनने ठाण्यात ‘कॅप्टन कूल’ हा कॅफे सुरु केला होता. त्यानंतर त्याने सिनेसृष्टी सोडली का? असा प्रश्न विचारण्यात येत होता. आता त्याने याबद्दलचे उत्तर दिले आहे. यशोमनने नुकतंच एका युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने विविध गोष्टींबद्दल खुलासा केला.
आणखी वाचा : “माझे नाव आणि फोटो…” ट्विटरवरील स्वत:च्या नावाचं फेक अकाऊंट पाहून श्रेयस तळपदे संतापला

यशोमन आपटे काय म्हणाला?

“अनेकजण मला पुन्हा मालिकेत बघण्यासाठी उत्सुक होते. मला जे कोणी भेटायचे ते मला सतत याबद्दल विचारायचे. मला अनेकांनी तर तुम्ही अभिनय सोडला का? असंही विचारण्यात आलं. त्या सर्वांना एकच सांगायचं की मी लोकांचा गैरसमज दूर करण्यासाठी ही मालिका आणि हे पात्र करत आहे.

मी मालिका किंवा सिनेसृष्टी सोडलेली नाही. मी अजूनही अभिनय करतोय. या मालिकेत माझा वेगळा रोल आहे. यातील पात्रही फारच वेगळं आहे. मी ही भूमिका करतोय हा मला सर्वोत्तम निर्णय वाटतोय. कारण मला चांगला अनुभवही येताना दिसत आहे.

मला चॉकलेट बॉय बोलतात हे मला नक्कीच आवडतं. पण मला कुठेतरी त्याला ब्रेक द्यायला मिळतो, त्याचाही मला आनंद आहे. त्यातच मला काही तरी वेगळं करायचं होतं, कारण मला चॉकलेट बॉयची इमेज ब्रेक करायची होती. एका वेगळ्या भूमिकेत मला प्रेक्षकांसमोर येता येईल, म्हणून हे पात्र निवडलं. हे फार चॅलेंजिंग आहे. मी यातून फार खूश आहे”, असे यशोमन आपटेने म्हटले.

आणखी वाचा : न्यूड फोटोशूट ते बोल्ड भूमिका, राखी सावंतच्या अटकेमुळे चर्चेत आलेली शर्लिन चोप्रा कोण?

दरम्यान यशोमन आपटे हा सध्या ‘शुभविवाह’ या मालिकेत आकाश हे पात्र साकारताना दिसत आहे. त्याबरोबर अभिनेत्री कुंजिका काळविंट, मधुरा देशपांडे, विशाखा सुभेदार, विजय पटवर्धन असे दमदार कलाकार प्रमुख भूमिकेत आहे. याच आठवड्यापासून ही मालिका सुरु झाली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-01-2023 at 09:46 IST

संबंधित बातम्या