अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या दोघांची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. दोघेही गेली अनेक वर्ष मराठी कलाविश्वात काम करत आहेत. अविनाश नारकर यांचा फिटनेस तरुणपिढीला लाजवेल असाच आहे. अभिनयाबरोबरच दोघेही सोशल मीडियावरील ट्रेंडिंग गाण्यावर भन्नाट रिल्स बनवतात. सध्या त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर मोदकांचा बेत, जुई गडकरीचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “अस्मिता ताई इथेही…”

अविनाश आणि ऐश्वर्या नारकर दोघंही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नुकताच अविनाश नारकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघांचेही जुने फोटो पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा : “मी तुमची पूर्वीपासून चाहती” मिसेस मुख्यमंत्र्यांचे ‘हे’ शब्द ऐकताच सुकन्या मोने सुखावल्या; सांगितला ‘वर्षा’वरील अनुभव

अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांनी ३ डिसेंबर १९९५ मध्ये लग्न केलं. ऐश्वर्या नारकर यांचं माहेरचं नाव पल्लवी आठल्ये होतं. लग्नानंतर दोघांनीही अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. या जुन्या आठवणींना उजाळा देत अविनाश नारकरांनी अनेक फोटो शेअर केले आहेत. “काही आठवणी…तुम्हाला आमचा कोणता फोटो आवडला?” असं कॅप्शन अभिनेत्याने या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा : Video: “मालिका बंद करा”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’चा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक संतापले; नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्याच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. “कमाल भारी आहात तुम्ही दोघं”, “डाएटच्या मागे लागू नका ताई आधी तुमचे गाल गुबगबीत होते”, “रब ने बना दी जोडी”, “चिरतरुण जोडपं” अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर सध्या अविनाश नारकर ‘कन्यादान’ या मालिकेत वडिलांची भूमिका साकारत आहेत. तसेच ऐश्वर्या नारकर या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत झळकत आहेत.