चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. त्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे फिटनेस व्हिडिओ सर्वाधिक चर्चेत असतात. त्यांच्या फिटनेस व सौंदर्याचं चाहत्यांकडून नेहमीच कौतुक करण्यात येतं. सध्या अभिनेत्रीने शेअर केलेला असाच एक व्हिडिओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

ऐश्वर्या नारकर त्यांचा आहार व व्यायाम यासंदर्भातील अनेक व्हिडीओ शेअर करत असतात. नुकताच अभिनेत्रीने लांबसडक काळ्या केसांसाठी व नितळ त्वचेसाठी काय काळजी घ्यावी यासंदर्भात एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ऐश्वर्या नारकरांच्या सगळ्या फोटो व व्हिडीओमध्ये त्यांचे लांबसडक काळे केस विशेष लक्ष वेधून घेतात. त्यांचे अनेक चाहते “तुम्ही केसांची काळजी कशी घेता?” याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये विचारपूस करतात. अखेर अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत केसांची निगा कशी राखावी यासंदर्भातील खास व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा : ४२ वर्षीय शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी केलं तिसरं लग्न; दोघांच्या वयात आहे तब्बल ‘एवढ्या’ वर्षांचं अंतर

ऐश्वर्या नारकर या व्हिडीओमध्ये कोरफडीचा गर काढून तो केसांच्या मुळाशी आणि चेहऱ्यावर लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. “कोरफडीचा गर लावून तुमच्या केसांची अशी काळजी घ्या…हेच माझ्या लांबसडक सुंदर केसांचं रहस्य आहे.” असं कॅप्शन ऐश्वर्या यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा : “माझ्या शाळेत पाचवीनंतर मराठी विषय…”, सुप्रिया पिळगावकरांनी लेकीसाठी घेतला होता मोठा निर्णय, श्रिया म्हणाली, “आईने…”

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, आजवर त्यांनी ‘या सुखांनो या’, ‘लेक माझी लाडकी’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. सध्या त्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत रुपाली हे नकारात्मक पात्र साकारत आहेत.