‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर नेहमी चर्चेत असतो. कधी वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी व्यावसायिक आयुष्यामुळे तो चर्चेत असतो. असा हा चर्चेत असलेला अक्षयनं आपल्या अभिनयाबरोबरच उत्तम निवेदनाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकत्याच संपलेल्या ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी अक्षय केळकरवर होती. त्यानं आपल्या अनोख्या अंदाजात, विनोदी शैलीनं ही निवेदनाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. सध्या अक्षयची सोशल मीडियावरील एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा – केतकी माटेगावकरचा ‘हा’ हॉलीवूड स्टार आहे क्रश; म्हणाली, “त्याला मराठी अंदाजात प्रपोज करेन…”

अभिनेता अक्षय केळकरनं ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाला वर्ष झाल्यानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यानं प्रेक्षकांचे आभार व्यक्त करत आतापर्यंतच्या प्रवासाविषयी लिहीलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाच्या सुरुवातीपासून ते ‘ढोलकीच्या तालावर’ पर्यंतच्या प्रवासाचा एक व्हिडीओ अक्षयने शेअर केला आहे.

हेही वाचा – ‘ढोलकीच्या तालावर’च्या निकालावर प्रेक्षक नाराज; म्हणाले, “शुभम बोराडेचं विजेता…”

हा व्हिडीओ शेअर करत त्यानं लिहीलं आहे की, “गेल्या वर्षी २ ऑक्टोबरला, बिग बॉसच्या आमच्या चौथ्या पर्वाचे ग्रँड प्रिमियर होते. आणि यावर्षी १ ऑक्टोबरला, ढोलकीच्या तालावर या आपल्या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडला. संपूर्ण एक वर्ष, दोन प्रवास, ट्रॉफीसाठीच्या दोन लढती, एक माझी स्वतःची आणि दुसरी आपल्या महाराष्ट्राच्या लावण्यवतींची. त्यांच्या आणि तुमच्या मधला निवेदक म्हणून मी दुवा होऊ शकलो. बिग बॉसच्या घरातली माझ्या नावाची ती पाटी मी माझ्या घरच्या दारावर सुद्धा लावलेली आहे. एक वर्तुळ पूर्ण झालं! खूप प्रेम मिळालं. खूप कौतुक झालं. हा प्रवास मी कधीही विसरू शकणार नाही.”

“माझ्या या प्रवासात मला बरोबर लाभलेल्या, अगदी छोट्यातला छोटा सहवास लाभलेल्या सुद्धा प्रत्येकाचा मी ऋणी आहे. आता कुठे सुरुवात झाली आहे. तुमची साथ मला अशीच कायम मिळत राहो. रसिकांना खरंच मायबाप का म्हणतात ते समजतंय, कारण आपल्या बाळा सारखंच प्रेम, आपुलकी, हक्क, कौतुक त्यांच्याकडून सतत जाणवतं. ते कायम माझ्या पाठीशी असेच उभे राहोत. माझ्या या प्रवासासाठी आणि माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद,” असं अक्षयनं लिहीलं आहे.

हेही वाचा – ‘या’ चिमुकल्यांना ओळखलंत का? एक आहे मराठीतील आघाडीची अभिनेत्री तर दुसरी भारतातील प्रसिद्ध खेळाडू

हेही वाचा – “मी लग्न केलं…” केतकी माटेगावकरचा खुलासा, म्हणाली, “माझा पहिला नवरा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अक्षयनं ‘बिग बॉस मराठी’चं चौथ पर्व आपल्या दमदार खेळाने, चातुर्याने जिंकलं होतं. तो ‘बिग बॉस मराठी’पूर्वी काही हिंदी मालिकांमध्ये झळकला होता. शिवाय अक्षय ‘दोन कटिंग’ या वेब फिल्ममध्ये समृद्धी केळकरबरोबर पाहायला मिळाला होता.