मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले आहे. काही महिन्यांपूर्वी अमृता खानविलकरचा चंद्रमुखी हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामुळे ती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली होती. त्यानंतर आता ती ‘झलक दिखला जा’या कार्यक्रमामुळे चर्चेत होते. काही दिवसांपूर्वी ती या स्पर्धेतून बाहेर पडली. यानंतर तिने भावूक होत प्रतिक्रिया दिली होती. त्यातच आता ती एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

अमृता खानविलकर ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. नुकतंच अमृता खानविलकरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने अप्रत्यक्षरित्या ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमाबद्दल भाष्य केले आहे. तिची ही पोस्ट फार व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : “याच साठी केला होता अट्टहास…” ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादात सुबोध भावेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“कधी कधी आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत कारण आपल्याला ज्याची गरज असते ते आपल्याला मिळत असतं. मला वाटतं हे स्वीकारणं हाच आयुष्यात पुढे जाण्याचा हा सर्वात शक्तिशाली मार्ग आहे”, असे अमृता खानविलकरने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : Jhalak dikhla Ja 10: अमृता खानविलकरच्या एक्झिटनंतर चाहत्यांचे निर्मात्यांवर गंभीर आरोप; तर अभिनेत्री पोस्ट करत म्हणाली, “मला..”

दरम्यान झलक दिखाला जा या स्पर्धेतून अमृता खानविलकर ही बाहेर पडली आहे. गेल्या आठवड्यात स्पर्धकांना त्यांचे कोरिओग्राफर्स बदलून दुसऱ्याच्या कोरिओग्राफरसह डान्स करायचा होता. तेव्हा तिने सनम जोहरबरोबर मायकल जॅक्सनच्या नृत्यशैलीतला डान्स केला होता. नाचताना ती मध्ये काही स्टेप्स विसरली. पण एक-दोन सेकंदानंतर तिने पुन्हा नाचायला सुरुवात केली. याचा परिणाम निकालावर झाला. त्यामुळे तिला स्पर्धेबाहेर जावे लागले. तिने सोशल मीडियावर या कार्यक्रमाबद्दल एक पोस्टही शेअर केली होती. त्यात तिने तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओला कॅप्श देताना ती म्हणाली, “मागचे दोन महिने माझ्यासाठी विलक्षण सुख देणारे होते. या काळामध्ये मी सर्वात जास्त आनंदी होते. पण आज जसा झलक दिखला जाच्या नवा भाग प्रसारित झाला, तसं मी नकळत त्या सुंदर रंगमंचाला निरोप दिला. आज जेव्हा मी अलिबागच्या या चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली बसून या प्रवासाकडे वळून पाहले, तेव्हा या कार्यक्रमामध्ये आणि प्रवासामध्ये मला साथ देणाऱ्या लोकांच्या आठवणीने भरुन आले”, असे कॅप्शन दिले आहे.