मराठी कलाविश्वातील सगळेच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय आहेत. कलाकारांच्या वाढदिवशी चाहत्यांना नेहमीच त्यांचे कधीही न पाहिलेले आणि विशेषत: बालपणीचे विविध फोटो पाहायला मिळतात. आपल्या लाडक्या कलाकारांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येक चाहत्याच्या मनात असते. त्यामुळे बहुतांश कलाकार बालपणीचे किंवा त्यांच्या संघर्षाच्या दिवसातील फोटो शेअर करून जुन्या आठवणींना उजाळा देत असतात.

सध्या इन्स्टाग्रामवर एका अभिनेत्रीच्या आईने शेअर केलेला असाच एक फोटो चर्चेत आला आहे. मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या आईने लेकीच्या वाढदिवसानिमित्त तिचा बालपणीचा फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. नाटक, चित्रपट, रिअ‍ॅलिटी शोमध्ये काम करून ही अभिनेत्री महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात या अभिनेत्रीने सहभाग घेतला होता.

हेही वाचा : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’च्या यशानंतर शर्मिष्ठा राऊत करणार नव्या मालिकेची निर्मिती! ‘झी मराठी’ने शेअर केला खास प्रोमो

‘बिग बॉस मराठी’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याआधी ही अभिनेत्री पुण्यात रेडिओ आरजे म्हणून काम करायची. त्यावेळी तिने ‘पुण्याची टॉकरवडी’ अशी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. आजही तिला घरोघरी याच नावाने ओळखलं जातं. ही अभिनेत्री नेमकी कोण आहे? जाणून घेऊयात…

फोटोमध्ये दिसणारी ही गोड चिमुकली मुलगी दुसरी-तिसरी कोणी नसून ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री अमृता देशमुख आहे. बालपणीच्या फोटोमध्ये अमृताला ओळखणे फार कठीण आहे. तिने नुकतंच कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता व ‘बिग बॉस’मधील तिचा सहस्पर्धक प्रसाद जवादेशी लग्न केलं.

हेही वाचा : “मला न्याय हवाय!” गौतमीच्या वाढदिवशी मृण्मयीने दिला ‘असा’ त्रास, देशपांडे बहिणींचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Vaishali Deshmukh (@kalakruti_by_vaishali)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेत्री आज तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करत असल्याने अमृताच्या आईने लेकीचा हा गोड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अभिनेत्रीच्या आई वैशाली यांनी या फोटोला “अय्या…आज माझा बड्डे आहे” असं कॅप्शन दिलं आहे. यामध्ये चिमुकली अमृता गालावर बोट ठेवून पोज देत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, मनोरंजन विश्वातील कलाकारांसह आज हजारो चाहत्यांकडून अमृतावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.