मराठमोळी अभिनेत्री आणि बिग बॉस फेम सई लोकूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नुकतंच सईने नवीन घर खरेदी केलं आहे. त्यानंतर आता सई थायलंडमधील फुकेतमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. याचे काही फोटो आणि व्हिडीओ सईने पोस्ट केले आहेत. मात्र त्यावरुन तिला ट्रोल करण्यात आले आहे.
सई लोकूर ही सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. नुकतंच सईने ‘जेलर’ या चित्रपटातील ‘कावाला’ या गाण्यावर रील शेअर केला आहे. यात सई ही हुबेहुब अभिनेत्री तमन्ना भाटियाप्रमाणेच हुकस्टेप करताना दिसत आहे.
आणखी वाचा : Video : प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने खरेदी केलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
पण या व्हिडीओत सईचा लूक पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला. अनेकांनी तिला तिच्या या लूकवरुन ट्रोल केलं आहे. सईचे सुजलेले पाय बघून अनेकांनी तिला वजन वाढलंय, कमी कर असे सल्लेही दिले आहे.
सईच्या या डान्स व्हिडीओवर एकाने कमेंट केली आहे. “तू जाडी झालीयेस”, असे एकाने म्हटले आहे. तर एकाने “लै वजन वाढल”, असं म्हटलं आहे. तसेच एकाने “पाय किती सुजले आहेत”, अशी कमेंट करत काळजी व्यक्त केली आहे. “फिटनेस नावाची काही गोष्ट असते की नाही”, “सई काय करुन ठेवलंय स्वत:च्या इमेजचं, किती सुंदर आहेस तू तुला हे अजिबात चांगलं वाटत नाही”, अशा कमेंटही या व्हिडीओवर पाहायला मिळत आहे.

दरम्यान सईने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. सईने ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘कीस किसको प्यार करु’, ‘जरब’, ‘मी आणि यू’ या चित्रपटात काम केले आहे. त्याबरोबर सई ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.