छोट्या पडद्यावर सध्या सर्वाधिक चर्चेत अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते. ती सध्या बिग बॉसमुळे चर्चेत आहे. अपूर्वा नेमळेकरने झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने शेवंता हे पात्र साकारले होते. बिग बॉसमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या अपूर्वा नेमळेकरने नुकतंच आंतररराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे.

अपूर्वा नेमळेकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच अपूर्वा नेमळेकरने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या एक कोलाज फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्या हातात एक पाटी आहे. त्यावर माझे वडील माझे हिरो आहेत असे लिहिले आहे.
आणखी वाचा : शिवसेनेचा पदाधिकारी, ८ वर्षांचे रिलेशन आणि घटस्फोट, जाणून घ्या अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल…

“तुम्ही माझ्यासाठी नेहमीच एखाद्या खंबीर व्यक्तींप्रमाणे उभे राहिले आहात आणि त्यामुळेच तुम्ही माझ्यासाठी फार खास आहात. मला तुमचे आज आणि नेहमीच कौतुक आहे. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा. मला तुझी आठवण येतेय बाबा”, असेही तिने म्हटले आहे.

आणखी वाचा : International Men’s Day 2022 : “महिलांनी पुरुषांशिवाय…” मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान दरवर्षी जगभरात १९ नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून साजरा केला करतो. पुरुषांशी निगडित वेगवेगळे विषय आणि समस्यांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. याला युनेस्कोनेही पाठिंबा दिला आहे. या निमित्ताने अनेक कलाकार हे सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहे.