अभिनेत्री दीपा परब, आदित्य वैद्य याची प्रमुख भूमिका असलेली ‘तू चाल पुढं’ मालिका ऑफ एअर होणार आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे मालिकेतील कलाकार सेटवरील शेवटचा दिवस चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसत आहेत.

अभिनेत्री दीपा परब, आदित्य वैद्य यांनी काल ‘तू चाल पुढं’च्या सेटवरील शेवटचा दिवस चाहत्यांबरोबर शेअर केला. भावुक होत दोघं निरोप घेताना पाहायला मिळाले. आता शिल्पी म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकरने मालिकेच्या सेटवरील शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: ‘झी मराठी’वरील ‘पारु’ मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित, प्रसाद जवादेसह झळकणार ‘हे’ कलाकार

ऑगस्ट २०२२मध्ये ‘तू चाल पुढं’ ही मालिका सुरू झाली होती. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अश्विनी, श्रेयस, शिल्पी, मयुरी अशी मालिकेतील सगळी पात्र घराघरात पोहोचली. पण आता मालिका शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. १३ जानेवारीला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.

अभिनेत्री धनश्री काडगावकरने मालिकेच्या सेटवरील शेवटचा दिवस, शेवटच्या सीनचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिल आहे, “…आणि इथे शिल्पीचा प्रवास संपला.” धनश्रीच्या या व्हिडीओवर मालिकेच्या प्रेक्षकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: अंकिता लोखंडे नात्यातून ब्रेक घेण्याचा करतेय विचार! पती विक्की जैनला म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनश्रीच्या व्हिडीओवर एका नेटकरीने लिहिल आहे, “खूप उशीर केला तुला अटक करायला, केव्हाच करायला पाहिजे होतं. पण ऑल ओव्हर तुझी अॅक्टिंग खरंच खूप भन्नाट. तुझ्यामुळेच मालिका बघत होतो.” तसेच दुसऱ्या नेटकरीने लिहिल आहे, “आता जरा कुठे बघावीशी वाटत होती…तोपर्यंत बंद का केली?…आता उलट अश्विनी बिझनेस वुमन झालेली दाखवायला पाहिजे होती.” तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिल, “शिल्पी म्हात्रे, आम्हाला तुझी खूप आठवण येईल.” अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर दिल्या आहेत.