scorecardresearch

“मी तब्बल १० वेळा…” अभिनेत्री जुई गडकरी लग्नाबद्दलच्या प्रश्नावर असं का म्हणाली? जाणून घ्या

“माझ्यासाठी २ फेब्रुवारी ही तारीख फारच खास आहे.”

jui gadkari marriage
जुई गडकरी

अभिनेत्री जुई गडकरी ही कायमच चर्चेत असते. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत जुई ही मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. जुईने या मालिकेत सायली नावाचे पात्र साकारले आहे. तिच्या या पात्राला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सायली आणि अर्जुनचा विवाहसोहळा पार पडला. याच पार्श्वभूमीवर जुई गडकरीने लग्नाबद्दल भाष्य केले आहे.

मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ‘पुढचं पाऊल’, ‘सरस्वती’, ‘बिग बॉस मराठी’ यांसारख्या मालिकांमधून जुई गडकरी ही घराघरांत पोहोचली. गेल्या अनेक वर्षांपासून ती एका गंभीर आजाराचा सामना करत आहे. नुकतंच जुईने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ यात प्रमुख भूमिकेत झळकत आहे. नुकतंच या मालिकेच्या निमित्ताने जुईने एक मुलाखत दिली. यात तिला तुझे हे मालिकेतील कितवं लग्न आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने फार मजेशीरपणे उत्तर दिलं.
आणखी वाचा : “…अन् उरलं सुरलं अवसान गळून गेलं”, गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या अभिनेत्री जुई गडकरीची पोस्ट चर्चेत

“मी आता लग्न करण्यात पटाईत झाली आहे. माझ्यासाठी २ फेब्रुवारी ही तारीख फारच खास आहे. कारण याच दिवशी माझी मालिकेत लग्न होतात. २ फेब्रुवारी २०१४ ला पुढचं पाऊल या मालिकेतील कल्याणीचं दुसरं लग्न झालं होतं. त्यानंतर २ फेब्रुवारी २०१९ ला माझं वर्तुळ मालिकेत लग्न झालं होतं. त्यानंतर आता ठरलं तर मग या मालिकेत २ फेब्रुवारी २०२३ ला माझं लग्न झालं.

मी आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. यात माझी अनेकदा लग्न झाल्याचे दाखवण्यात आलं आहे. मी वैयक्तिक आयुष्यात विवाहबद्ध झालेली नसले तरी ऑनस्क्रीन मात्र तब्बल १० वेळा माझं लग्न झालं आहे, असं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळेच मी लग्न करण्यात पटाईत झाले”, असे गंमतीशीर पद्धतीने जुई गडकरीने म्हटले.

आणखी वाचा : विशाखा सुभेदारने परिधान केलेल्या साडीचे लता मंगेशकरांशी आहे खास कनेक्शन, तब्बल १४ महिन्यांनी मोडली घडी

दरम्यान जुई गडकरीने पुढचं पाऊल या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या मालिकेत तिने कल्याणी हे पात्र साकारलं होतं. या पात्रामुळेच तिला घराघरात ओळख मिळाली. पुढचं पाऊलनंतर जुई ही सरस्वती, वर्तुळ, बिग बॉस मराठी आणि आता ठरलं तर मग या मालिकेत झळकली. दरम्यान या मालिकेत सध्या अनेक उत्कंठावर्धक वळण येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 16:16 IST