मराठमोळी अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीने ‘काव्याअंजली’ या नवीन शो मालिकेतून मराठी टीव्हीवर पुनरागमन केलंय. सोमावारपासून सुरू झालेल्या या मालिकेत कश्मिरा काव्या नावाची मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेतून पुनरागमन करणाऱ्या कश्मिराने आनंद व्यक्त केला आहे. कश्मिराने या मालिकेच्या निमित्ताने ‘इ-टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने मोठ्या ब्रेकनंतर टीव्हीवर केलेलं पुनरागमन, टीव्हीपासून इतका काळ लांब असल्याचं कारण व तिला ज्योतिषशास्त्राची असलेली आवड अशा विविध गोष्टींवर भाष्य केलं.

हेही वाचा – “मार खाऊ शकता” म्हणणाऱ्या घनश्याम दरोडेला गौतमी पाटीलचं सडेतोड उत्तर; म्हणाली, “मी इतकंच म्हणेन…”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

पुनरागमन करण्याविषयी बोलताना कश्मिरा म्हणाली, “मला असा शो करायचा होता जिथे मी एक व्यक्ती म्हणून चमकू शकेन. काव्याअंजली शो माझ्या आयुष्यात एका चमत्काराप्रमाणे आला आहे. हा शो माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरणार आहे. यात मी काव्याची भूमिका साकारत आहे, जिला तिच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायला आवडते आणि सर्वांनी आनंदी राहावे अशी तिची इच्छा आहे. काव्याचे तिची चुलत बहीण अंजलीवर निखळ प्रेम आहे आणि तिला तिच्याही आयुष्यात आनंद आणायचा आहे. कश्मिरा आणि काव्या समान आहेत आणि म्हणूनच मी या भूमिकेकडे आव्हान म्हणून पाहत नाही.”

हेही वाचा – “तो पळून…”, मृणाल ठाकुरने एक्स बॉयफ्रेंडबद्दल केलेला खुलासा

काश्मिराने पुढे ज्योतिषशास्त्रातील तिची आवड आणि त्याबद्दलचे तिचे प्रेम कसे वाढले याबद्दल सांगितले. ती म्हणाली, “मी एक व्यावसायिक ज्योतिषी आहे आणि लोकांना त्यांच्या करिअरचा आणि जीवनाचा योग्य मार्ग निवडण्यात मदत करते. ज्योतिषशास्त्र मला आवडतं आणि त्यात मला रस आहे. माझा हेतू लोकांना मदत करणे आणि त्यांना योग्य मार्ग निवडण्यात मदत करणे हा आहे. मी कधी कधी माझ्या शूटिंगमधून वेळ काढून माझ्या क्लायंटला फोनवर मार्गदर्शन करते आणि मग मी शूटिंग करते. काव्यअंजलीच्या शूटिंगनंतर मी आता अभिनय व ज्योतिषशास्त्र या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळत आहे.”

गेली काही वर्षे टीव्हीपासून दूर असण्याबाबत कश्मिरा म्हणाली “मी अभिनयापासून पूर्णपणे दूर नव्हते. मी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करत होते. टीव्हीवर काम करण्यासाठी मी योग्य संधी शोधत होते. मला काव्याअंजली मालिकेची ऑफर आली, मला मालिका आवडली व आता मी टीव्हीवर परत आले आहे.”

Story img Loader