झी मराठी वरच्या ‘अस्मिता’ या मालिकेने मयुरी वाघला ओळख मिळवून दिली. तिने या मालिकेत एका गुप्तहेराची साकारलेली भूमिका आबालवृद्धांना पसंत पडली होती. मयुरी सध्या आपल्याला एका मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे. ती आता एका नव्या भूमिकेत आपल्यासमोर येत आहे. यावेळी तिची भूमिका थोडी वेगळी असणार आहे. मालिकेत ती आई एकविरेच्या रूपात दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वी या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नुकतीच मालिकेतील कलाकार अमृता पवार, मयुरी वाघ या दोघीनी कार्ला येथे जाऊन आई एकविरेचे दर्शन घेतले. यावेळी तिने माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा तिने तिला आलेल्या दैवी अनुभवाबद्दल सांगितले आहे. ती असं म्हणाली की “काही वर्षांपूर्वी मी माझ्या कुटुंबाबरोबर लवासा येथे गेले होते. तिथून पार्ट येत असताना आम्हाला उशीर झाला. घाटातून उतरत असताना तिथे लाईट्सदेखील नव्हते. आम्ही विचार करत होतो आता खाली उतरायचं, मात्र तेवढ्यात काही अंतरावर आम्हाला एक गाडी दिसली जी आम्हाला इंडिकेटर देत होती तिच्या आधारे आम्ही तो घाट उतरलो मात्र घाट उतरताच ती गाडी नाहीशी झाली. कदाचित त्यातील व्यक्ती निघून गेली असावी मात्र मी याला दैवी चमत्कार मानते.” अशा शब्दात त्यानो प्रतिक्रिया दिली.

मला फरक पडत नाही मी कोण….” मानसी नाईकच्या पतीची पोस्ट चर्चेत!

मालिकेत ती आई एकविरा साकारत आहे, त्यासाठी तिने जेव्हा लूक टेस्ट केली त्याबद्दल बोलताना ती असं म्हणाली की “मी जेव्हा हा लूक केला तेव्हा त्याचा पहिला फोटो माझ्या आईला पाठवला ती फोटो बघून खुश झाली.” ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ असं तिच्या मालिकेचे नाव आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मयुरीने ‘वचन दिले तू मला’, ‘ही वाट दूर जाते’, ‘मेजवानी’, ‘सुगरण’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मयुरीने बालकलाकार म्हणून ‘उठी उठी गोपाळा’ हे नाटक केले. कॉलेजमध्ये शिकत असतानाच ‘मांगल्याचे लेणे’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर केले.