‘माझिया प्रियाला प्रित कळेना’, ‘तू तिथे मी’, ‘हे मन बावरे’ या मराठी मालिकांमध्ये अभिनय करून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानिस होय. चार वर्षे अमेरिकेत राहून मृणाल नुकतीच भारतात परतली आहे. चार वर्षे ती फक्त अभिनयापासूनच नाही तर आपला देश, घर व कुटुंबापासूनही दूर होती. आता मृणाल पती व चिमुकल्या लेकीबरोबर कायमची भारतात परतली असून ती अभिनयात पुनरागमन करण्याच्या विचारात आहे.

मृणालला नूर्वी नावाची लेक आहे. तिचा जन्म अमेरिकेत झाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नूर्वी अमेरिकेत काय शिकली, याबद्दल मृणाल दुसानिसने सांगितलं. तसेच मुलीच्या रुटीनबद्दलही तिने माहिती दिली. “मी नूर्वीचं रुटीन सेट करण्याचा प्रयत्न करतेय, जे अजूनही झालेलं नाही. मी सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ बघते की त्यांची मुलं किती वाजता उठतात, केव्हा काय खातात. पण इथे मला स्वतःचच डाएट मेंटेन करणं जमत नाहीये तर लहान बाळ ते कुठून करणार. मी तिला तिच्या हाताने खायची सवय लावली आहे. तिला पियानोची ओळख करून दिली. तिला पुस्तकांमधील गोष्टी वाचून दाखवत होतो, तिथेही आणि इथेही तर ती एक तिला सवय लागली आहे,” असं मृणाल लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…

“इथे नूर्वी आता आज्जीशी खेळते, माझ्या आईबरोबर खेळते. इथे तिला खाली मित्र मिळाली आहेत, तिथं नव्हती. इथं तिच्याशी सगळेजण मराठीतच बोलतो. तिकडे अमेरिकेत ती फक्त ‘नो’ हा एकच शब्द शिकली आहे. आता ती ‘आहे’ हा नवीन मराठी शब्द शिकली आहे. मला तिला नॉर्मल, घरगुती ठेवावसं वाटतं. आता तिचं ती काही गोष्टी शिकतेय, मराठी बोलतेय, खाली मित्रमैत्रिणींबरोबर खेळते, तिच्याकडे सायकल आहे आता तर सायकल चालवते. मला तिला गाणं शिकवायचं आहे, तिला पोहताना शिकवायचं आहे. मला हे तिला तिकडेच शिकवायचं होतं पण आम्ही अचानक इकडे आलो त्यामुळे जितक्या लवकर ती शिकेल तितकं चांगलं आहे. बघू आता ती या सगळ्याला कसा रिस्पॉन्स करते ते,” असं मृणाल दुसानिस म्हणाली.

अमेरिका व्हाया मुंबई! ‘अशी’ आहे मृणाल दुसानिसच्या अरेंज मॅरेजची गोष्ट! कसं जमलं लग्न? जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुपरहिट मालिका दिल्यानंतर मृणाल लग्नानंतर चार वर्षांसाठी अमेरिकेला गेली आणि ती अभिनयापासून दूर होती. पण या काळात ती सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. ती अमेरिकेत राहूनही तिचे, पती व लेकीबरोबरचे आनंदाचे क्षण फोटो व व्हिडीओतून चाहत्यांबरोबर शेअर करायची. आता मृणाल मायदेशी परत आल्यावर चाहते तिला पुन्हा एकदा टीव्ही स्क्रीनवर पाहण्यास उत्सुक आहेत.