मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसेला ओळखले जाते. ती आतापर्यंत अनेक मराठी, हिंदी मालिका आणि चित्रपटात झळकली आहे. सध्या ती मालिका, चित्रपट यांपासून थोडी दूर आहे. मात्र एका व्हिडीओमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.
नेहा पेंडसेने नुकतंच एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमावेळी तिने काळ्या रंगाचा एक गाऊन परिधान केला होता. त्याबरोबरच तिने गळ्यात डायमंड नेकलेस आणि हातात त्याच रंगाची अंगठी परिधान केली होती. मात्र तिच्या या लूकमुळे ती ट्रोल झाली आहे.
आणखी वाचा : “आमचा साडेतीन वर्षांचा संसार…” दोनदा घटस्फोट झालेल्या व्यक्तीबरोबर लग्न करणाऱ्या नेहा पेंडसेचे वक्तव्य, म्हणाली “लग्नानंतर स्त्रियांनाच…”
तिच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. “सांभाळता येत नसेल तर चादरीसारखा ड्रेस का परिधान केलास”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकीने “मांडी दाखवणं इतकं गरजेचं आहे का? ड्रेस ताणून ताणून बाजूला केलाय”, असे म्हटले आहे. “ही काय फॅशन आहे, वाचव देवा”, असे एकाने म्हटले आहे. तर एकाने “वय वाढतंय तशी ड्रेसची लांबी कमी होतेय”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : “तुम्ही ब्राह्मण असूनही मांसाहार करता?” चाहतीच्या कमेंटवर सुकन्या मोने म्हणाल्या, “ते चांगलं की वाईट…”
दरम्यान नेहाने आपल्या कारकिर्दीची सुरवात बालकलाकार म्हणून केली आहे. ‘प्यार कोई खेल नही’ या हिंदी चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘दाग द फायर’, ‘देवदास’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच झी वाहिनीवरील ‘भाग्यलक्ष्मी’ या मराठी मालिकेने तिला वेगळी ओळख निर्माण करून दिली.