दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरात दिवाळीची धामधुम पाहायला मिळत आहे. दिवाळी म्हटलं की नवीन कपडे, फराळ, मिठाई, आणि भेटवस्तू यांचा समावेश होतो. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी नुकतंच दिवाळीनिमित्त त्यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्याबरोबरच त्या दरवर्षी कशाप्रकारे दिवाळी साजरी करतात, याबद्दलही त्यांनी भाष्य केले आहे.

निवेदिता सराफ या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर भाग्य दिले तू मला या मालिकेत रत्नमाला हे पात्र साकारत आहे. नुकतंच त्यांनी मालिकेच्या सेटवर जय्यत दिवाळी साजरी केली. त्यावेळी त्यांना सराफांच्या घरात दिवाळी कशी साजरी केली जाते, याबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांनी उत्तर देत बालपणीच्या आठवणी सांगितल्या.
आणखी वाचा : कानटोपी, स्वेटर अन्…; आकाश ठोसरची केदारनाथ सफर, फोटोने वेधलं लक्ष

“आम्ही लहान असताना आई खाजाचे कानोले, लाडू चिवडा, बाळ फराळ असे स्वादिष्ट पदार्थ बनवत असे. लग्न झाल्यावर दिवाळीच्या वेळी सासरचे लोक माझ्या घरी येतात. त्यानंतर मग आम्ही सगळे मिळून जेवतो. यावर्षी आम्ही आमच्या नातेवाईकांच्या घरी जाणार आहोत. तरीही मला हे सगळे दिवाळीचे पदार्थ बनवायला आवडतात.

माझा मुलगा अनिकेत गेल्या काही वर्षांपासून दूर आहे. मुलांशिवाय सण साजरे करणे रिकामे वाटते. पण, आम्ही त्याच्यासोबत व्हिडीओ कॉल करतो. त्याच्याबरोबर एकत्र दिवाळी फराळ करतो. मी त्याला दरवर्षी फराळ पाठवते.

तसेच मी आणि अशोक, श्रद्धानंद महिला आश्रम आणि कुमुदबेन इंडस्ट्रियल होम फॉर ब्लाइंड मुलींना दिवाळीच्या फराळाचे वाटप देखील करतो. जे घरापासून दूर आहेत आणि एकटे साजरे करू शकत नाहीत त्यांना दिवाळीचा फराळ पुरवतो”, असे निवेदिता सराफ यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान निवेदिता सराफ यांनी वयाच्या ५ व्या वर्षीपासून सिनेसृष्टीत काम केले आहे. आज त्या ६० वर्षांच्या असल्या तरी त्यांचं सौंदर्य आणि अभिनयाची चर्चा सर्वत्र पाहायला मिळते. निवेदिता सराफ यांनी ‘अखेरचा सवाल’, ‘कॉटेज नं ५४’, ‘टिळक आणि आगरकर’, ‘तुझ्या-माझ्यात’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘वाडा चिरेबंदी’ यांसारख्या अनेक नाटकात काम केलं. सध्या त्या ‘मी स्वरा आणि ते दोघं’ या नाटकात झळकताना दिसत आहेत.