महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यादरम्यान मनसेच्या नवीन पक्षगीताचे लोकार्पण करण्यात आले. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तने हे गाणं गायलं आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच मनसेच्या या नव्या गाण्यावर प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी थिरकली आहे.

मनसेचे नवीन पक्षगीत हे ५ मिनिटांचे आहे. “प्रश्न जिथे मनसेचा, मार्ग तिथे मनसेचा, नवनिर्माण घडवूया, मनसे…” असे या गाण्याचे बोल आहेत. नुकतंच ‘राज ठाकरे फॅन क्लब’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन प्राजक्ता माळीचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत प्राजक्ता माळी ही मनसेच्या नव्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी प्राजक्ता ही छान मराठमोळ्या पद्धतीने या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.
आणखी वाचा : “मी लग्न करायला तयार, पण…” प्राजक्ता माळीने सांगितली लग्नासाठीची पहिली अट

या व्हिडीओत प्राजक्ता ही गाण्याच्या लिरिक्सप्रमाणे डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे प्राजक्ताला हे गाणं तोंडपाठ असल्याचेही दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : “ती इतकी परफेक्ट कशी?” प्राजक्ता माळीला ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची करायची हेरगिरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या व्हिडीओवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. “महाराष्ट्राची मराठमोळी शेरणी….”, अशी कमेंट एका व्यक्तीने या व्हिडीओवर केली आहे. तर एकाने “नुसत गाण्यावर नाचून चालणार नाय , सरकार मनसे च आल पाहिजे असं काहीतरी करा”, अशी कमेंट केली आहे. “ह्याला बोलतात प्राजक्तराजची भरारी गर्व आहे आम्हाला आमच्या आपल्या अस्सल मराठी कलाकारांचा आपल्या प्राजूचा”, अशी कमेंट एकाने केली आहे.