scorecardresearch

प्राजक्ता माळीला लागले प्रेमाचे वेध? फोटो शेअर करत म्हणाली…

प्राजक्ता माळीच्या इन्स्टाग्राम पोस्टने वेधलं लक्ष, शेअर केलेले फोटो चर्चेत

प्राजक्ता माळीला लागले प्रेमाचे वेध? फोटो शेअर करत म्हणाली…
प्राजक्ता माळीची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत. (फोटो: प्राजक्ता माळी/ इन्स्टाग्राम)

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी कायमच चर्चेत असते. प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. प्राजक्ता अनेकदा तिचे फोटो, कामाबद्दलची माहिती शेअर करत असते.

प्राजक्ताने नुकतंच काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. प्राजक्ताने फोटोमध्ये लाल रंगाची साडी नेसली आहे. मोत्याचे दागिने घालून तिने पारंपरिक लूक केला आहे. या फोटोला तिने ‘ये लाल इश्क…ये मलाल इश्क’ असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा>> अनिल कपूर यांची जितेंद्र जोशीसाठी खास पोस्ट, ट्वीट करत म्हणाले…

हेही वाचा>> ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना खानचं १३ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ब्रेकअप? पोस्टमुळे चर्चेला उधाण

प्राजक्ताच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टमुळे ती प्रेमात पडली आहे की काय, अशी चर्चा रंगली आहे. प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा>> अवघ्या एका महिन्याच्या लेकीला घरी सोडून आलिया भट्ट करतेय योगा; नेटकरी म्हणतात…

‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळविलेली प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ याशोचे सूत्रसंचालन करत आहे. प्राजक्ताला नृत्याची आवड असून ती एक उत्तम नृत्यांगणा आहे. प्राजक्ताने अनेक मालिका व चित्रपटांत काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘लकडाऊन लग्न’, ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 13:55 IST

संबंधित बातम्या